Narayan Rane Saam Tv
महाराष्ट्र

Narayan Rane on Disha Salian case : दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांची हत्याच, नारायण राणे यांचा पुनरुच्चार

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत यांची हत्या झाली आहे, ही माझी ठाम भूमिका आहे.

Shivaji Kale

नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची तत्कालीन मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी लावून धरला आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली. या प्रकरणी आता केंद्रीय मंत्री नारायण यांनी देखील भाष्य केलं आहे.

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत यांची हत्या झाली आहे, ही माझी ठाम भूमिका आहे. या दोघांची आत्महत्या नसून ही हत्या आहे. सुशांत सिंह यांची हत्या होताना आणि दिशा सालियानवर अत्याचार होताना काही लोकांनी पाहिलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होऊ द्या, असं नारायण राणे यांनी म्हटल. (Latest Marathi News)

दिशा सालियन प्रकरणातील मोबाईल पुरावे मिळायला पाहिजेत. मात्र एवढ्या दिवसांनी मिळतील की नाही सांगता येत नाही. आमच्या जवळ जे पुरावे आहेत ते आम्ही एसआयटीला सादर करु. आता काही ठाकरे यांची सत्ता नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी समोर येतील, असं नारायण राणे यांनी म्हटलं.

अभिनेता डिनो मारियाचा या प्रकरणाशी संबंध आहे हे तपासून पाहिलं पाहीजे. त्यामुळे चौकशीतून सत्य नक्की बाहेर येईल, असा दावा नारायण राणे यांनी केला.

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या दिवशी उद्धव ठाकरे हे छाताडावर नाचू असं म्हणाले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत काय झालं. उद्धव ठाकरे यांना अवघ्या सातशे जागा मिळाल्या. तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पुढच्या वेळी तर चित्र आणखी वेगळे असणार, एकही जागा येणार नाही. शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी पुरुष शिल्लक नाहीत, अशी टीका देखील नारायण राणेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

SCROLL FOR NEXT