नागपूर : हिवाळी अधिवेशनात विविध विषयांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. मात्र आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर महाविकास आघाडीचे आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार आक्रमक भूमिका घेत नसल्याने आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरुन सरकारवर सडकून टीका करायची असे ठरलेलं असताना अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली.
सीमावाद असो की एकनाथ शिंदे यांच्यावर कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप असो याबाबत अजित पवार आक्रमक भूमिका घेत नसल्याने माहविकास आघाडीतील आमदार नाराज आहेत. (Maharashtra Winter Session)
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित भूखंड घोटाळाप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिक घेण्याचं ठरलं होतं. मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्याची ती मोठी संधी होती. मात्र विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी तितकी आक्रमक भूमिका घेतली नाही, असं महाविकास आघाडीतील आमदारांचं म्हणणं असल्याचं सूत्रांकडून कळतंय.
त्यानंतर सीमावाद, राज्यपालांच्या मुद्द्यावर देखील आक्रमक होण्याची संधी विरोधकांना होती. काल छगन भुजबळ यांनी मुंबईबाबत भूमिक मांडली, त्यावरही अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधी पक्षातील आमदारांना आश्चर्य वाटलं.
मात्र आज जयंत पाटलांच्या मुद्द्यावरुनही अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली. तर दिशा सालियन प्रकरणात सत्ताधारी पक्षाकडून 14 आमदार बोलले, तर विरोधी पक्षातून काही मोजक्या आमदारांना बोलण्याची संधी मिळाली, याबाबतही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.