मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार जंयत पाटील निलंबित; हिवाळी अधिवेशन तापलं

Suspension OF NCP Leader Jayant Patil: जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांनी आक्रमक पवित्रा घेत तुम्ही असे बोलू शकत नाही, निलंबन करा अशी मागणी केली होती.
Jayant Patil
Jayant Patil SAAM TV
Published On

Jayant Patil Today News: राज्याच्या हिवाळी अधिवेशनातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना निलंबीत करण्यात आलं आहे. नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी विधानसभेच्या अध्यक्षांबाबत अपशब्द वापरले होते, यामुळे हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जंयत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. जयंत पाटील यांच्या विधानाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Jayant Patil
Covid Variant BF.7: भारतात पुन्हा लॉकडाऊनची गरज पडेल का? डॉ. रवी गोडसेंना कसली भीती, पाहा Exclusive मुलाखत

राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आजच्या कामकाजात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांंना अपशब्द वापरल्यामुळे निलंबनाची कारवाई मागणी व्हावी अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली होती, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीच आमदार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित (Suspension) केलं आहे. यानंतर विरोधकांनी अधिवेशनातून सभागृहाचा त्याग (वॉकआऊट) केलं आहे..

नेमकं काय घडलं होतं?

विधिमंडळ कामकाजात विरोधी पक्षांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता. यावरुनच ते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अध्यक्ष तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांनी आक्रमक पवित्रा घेत तुम्ही असे बोलू शकत नाही, निलंबन करा अशी मागणी केली. या मागणीवरुन भाजपा (BJP) आमदार आक्रमक झाले ज्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटे तहकुब करण्यात आले होते.

जयंत पाटील यांच्या या विधानानंतर निलंबनाच्या कारवाईवर विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात बैठक सुरू झाली, त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते उपस्थित होते. या बैठकीत विधीमंडळ सचिवांनाही बोलावले होते, यानंतर जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं.  (Latest Marathi News)

Jayant Patil
Shivsena News: शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटाच्या खासदारांची दिल्लीत बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?

विरोधकांचा सभात्याग

याबाबत अजित पवार म्हणाले की, महापुरुषांच्याबद्दल बेताल वक्तव्य असेल, भूखंड घोटाळा असेल, याची माहिती आमच्या नाना पटोले जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होती. आज सत्ताधारी पक्ष वेगळ्या मानसिकतेत होते, दिशा सालियानबद्दल अनेक जण बोलले. सभागृह चालवण्याचे काम जसे सत्ताधारी यांचे असते तसे विरोधकांना आपले आयुध वापरण्याचा अधिकार असतो. दिशाच्या आई-वडिलांनी याआधी आमच्या मुलीची बदनामी थांबवा असे म्हटले होते. पण दुर्दैवाने आपल्या राज्यात सत्ताधारी पक्षात काही सिनिअर लोक सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिवसेनेबाबत गरळ ओकण्याचे काम चाललेल होते तसाच आज केविलवाणा प्रयत्न केला जातो.

सुशांतने आत्महत्या केली हे तपासात उघड झाले. पण नवीन नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या जयंत पाटील यांना देखील राग आला. सर्वांना मिळवून-मिसळवून वागणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. माझा जसा फटकळ स्वभाव आहे तसा त्यांचा नाही. अतिशय संमजसपणे आम्ही सर्वाना समजावून सांगत होतो. आम्ही पण राजकारण करणारी माणसे आहोत. आम्हाला विनियोजन बिलावर बोलायचं होतं. आज आमचा प्रस्ताव होता पण त्यांनी काही समंजस भूमिका घेतली नाही. नागपूरचे अधिवेशन संपेपर्यंत त्यांनी निलंबन केले, त्यामुळे आम्ही आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com