Dr. Ravi Godse Exclusive Interview : चीनसह जगभरात कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढक आहे, त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. चीनमध्ये नव्यानेच आढळून आलेला BF.7 या व्हेरिएंटने हेदौस माजवला आहे. या व्हायरची भारतात देखील एंट्री झाली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 चे चार रुग्ण आढळले आहेत. गुजरात आणि ओडिशात या व्हेरिएंटचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारल अलर्ट झालं आहे.
याबाबत सामटीव्हीने अमेरिकास्थित डॉ. रवी गोडसे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. भारतात पुन्हा कोरोनाची लाट येईल का आणि लॉकडाऊन करावं लागेल का अशा अनेक प्रश्नांवर डॉ. गोडसे यांनी मार्गदर्शन केलं आहे. (corona latest update)
डॉ. गोडसे (Dr. Ravi Godse) म्हणाले, भारतीयांनी कोरोनाची बिलकुल भीती नाही, तशी कोरोनाही लहर वैगेरे येणार नाही. आपण जे म्हणतो रुग्ण वाढले ते केसेस वाढले आहेत, पण त्यातून लोकं बरेही होतायत. ओमिक्रॉन मामुली व्हेरिएंट आहे. चीनमध्ये नैसर्गिक संसर्ग कधी नव्हता त्यामुळे त्यांना याबाबत अनुभव नव्हता. पण, मला काळजी याची आहे, मला खूप भीती याची वाटतेय की, आपल्याला काळजी आहे या काळजीपोटी आपण जे हजार उपद्व्याप करुन बसू ना त्याची मला भीती वाटते असं गोडसे म्हणाले. (corona latest variant)
आता काय करायचं याबाबत केंद्राने मीटिंग घेतली. पण, चीनने कोव्हिड थांबवण्यासाठी काय केलं? चीनने ३ वर्ष झाले झीरो कोव्हिड पॉलिसी आणली, २१-२१ वेळा टेस्ट आणि ५०-५० दिवस लोकांना क्वारंटाईन केलं, मास्क लावले पण एवढं करुनही चीनमध्ये बोंब आहे. आपण कोव्हिडला थांबवू शकत नाही हे जेव्हा चीनला कळेल तेव्हा सुर्य पुर्वेला उगवेल असं डॉ. गोडसे म्हणाले.
तसेच ओमिक्रॉन चीनला थांबवेल पण, भारताला ओमिक्रॉन थांबवू शकत नाही. कारण आपल्या बऱ्याच जणांचे व्हक्सिनचे दोन डोस झाले आहेत आणि बऱ्याच जणांना ओमिक्रॉन होऊन गेलेला आहे, म्हणजे आपल्याकडे दुहेरी चिलखत आहे. त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलाईज्ड होण्याची गरज पडणार नाही, आपल्याला ९०% संरक्षणा आहे असा दावाही डॉ. गोडसे यांनी केला आहे. (Latest Marathi News)
२०२१ मध्ये किती लोकं हॉस्पिटलमध्ये पोहोचले? ओमिक्रॉनच्या (Omicron) नावाखाली लोकांच्या नाकात नळ्या घातल्या. ओमिक्रॉन नावाचा ढोल बढवून आपण काय मिळवलं? ओमिक्रॉनला आता आपण नाही थांबवू शकत आणि ते शक्यही नाही तसेच त्याची गरजही नाही. BF.7 ची आर व्हॅल्यू १८ आहे म्हणजे एकाला या व्हेरिअंटची लागण झाली तर, १८ लोकांना हा संसर्ग होतो. पण, ही आर व्हॅल्यू लोकसंख्येवरही अवलंबून असते.
आपण याला थांबवू शकत नाही हे आधी कबूल केलं पाहिजे. मास्क वैगेरे घालण्याची काही गरज नाही. फक्त डॉक्टरांना आणि हाय रिस्क लोकांना मास्क लावू द्या, बाकीच्यांना त्याची गरज नाही. ६५ वर्षांच्या लोकांना आणि हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना आपल्याला यापासून वाचवायचं आहे असं डॉ. गोडसे म्हणाले आहेत.
आता या लोकांना कसं वाचवायचं? तर त्यासाठी एक औषध आहे. एक Nirmatrelvir नावाची गोळी आहे, जी ८९% परिणामकार आहे. ती भारतात एप्रिल २०२२ ला येणार होती तिची किंमत ५२०० आहे. याबाबत मी पुण्यातील मोठ्या-मोठ्या फार्मसींना फोन केला पण भारतात कोणालाही याबाबत माहिती नाही हे कारण अजूनही ही गोळी भारतात आलेली नाही. मग हे covid appropriate behaviour नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जपानची xocova गोळीही सेफ वाटले तीही आणली नाही मग हे चुकी कुणाची? omicron adjusted bivalent booster ते आलं का? आपली भारताची mRNA vaccines डिसेंबर २०२१ ला येणार होती तिही आली नाही. bivalent booster नाही, Nirmatrelvir नाही, Evusheld नाही, Ensitrelvir नाही या अनेक गोष्टी नाही आणि लोकं बेजबाबदार? याला काय अर्थ आहे? आता मास्कने काहीही फरक पडत नाही हा खूपच संसर्गजन्य आहे. मास्क घातल्याने खोट्या सुरक्षतेतची भावना येते असंही डॉक्टर गोडसे म्हणाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.