नागपूर : विधानसभा अध्यक्षांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जंयत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. जयंत पाटील यांच्या विधानाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता स्वत: जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कोणतेही आयुध नसताना अचानक सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलतात. सत्ताधारी पक्षाचे 14 सदस्य बोलतात बाकीच्यांना बोलू देत नाहीत. मी आवाहन केले निर्लज्जपणा सारखे वागू नका. माझा माईक चालू नसताना बोललो. तरीदेखील आज हा निलंबनाचा ठराव मांडला गेला, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. (Jayant Patil)
विरोधीपक्षाचा आवाज दाबला जात आहे. 32-33 वर्ष माझ्याकडून कधीही अपशब्द वापरला गेला नाही. माझं भाषण आणि माईक चालू नव्हता. पण सरकारला जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला तो प्रसंग टाळायचा होता, म्हणून माझं निलंबन केले गेले असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
निर्लज्जपणा आपण सहजासहजी बोलतो. शेवटी सभागृहाने निर्णय घेतला आहे. माझ्याकडून कुणाचाही अवमान करण्याचा उद्देश नव्हता. मात्र सध्या जे सुरु आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे, असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं. (Maharashtra Winter Session)
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले की, आज सत्ताधारी पक्ष वेगळ्या मानसिकतेत होते, दिशा सालियानबद्दल अनेक जण बोलले. राज्यात सत्ताधारी पक्षात काही सिनिअर लोक सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिवसेनेबाबत गरळ ओकण्याचे काम चाललेल होते तसाच आज केविलवाणा प्रयत्न केला जातो.
सुशांतने आत्महत्या केली हे तपासात उघड झाले. पण नवीन नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या जयंत पाटील यांना देखील राग आला. सर्वांना मिळून-मिसळून वागणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. माझा जसा फटकळ स्वभाव आहे तसा त्यांचा नाही. अतिशय संमजसपणे आम्ही सर्वाना समजावून सांगत होतो. आम्ही पण राजकारण करणारी माणसे आहोत. आम्हाला विनियोजन बिलावर बोलायचं होतं. आज आमचा प्रस्ताव होता पण त्यांनी काही समंजस भूमिका घेतली नाही. नागपूरचे अधिवेशन संपेपर्यंत त्यांनी निलंबन केले, त्यामुळे आम्ही आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.