Narayan Rane on nitish kumar  Saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane News: 'नितीश कुमार आमच्यासोबत आले तर...',इंडिया आघाडीवर भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण

Vishal Gangurde

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

Narayan Rane News:

देशातील २५ हून अधिक विरोधी पक्षांनी 'इंडिया आघाडी'च्या छताखाली एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरात सुरुवात केली आहे. सध्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपावरून बैठकांचा सपाटा लावला आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपावरील अंतिम बैठकीनंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे स्पष्ट होईल. याचदरम्यान, इंडिया आघाडीवर भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं. 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आमच्यासोबत आले तर त्यांना अधिकचं काम करता येईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणूक आणि इंडिया आघाडीवर भाष्य केलं. 'विरोधक मोदींचा पराभव करायला सगळे एकत्र येत आहेत. हे काँग्रेस आणि विरोधक नेमकं देशासाठी काय करणार आहेत? गेल्या सत्तर वर्षात यांनी काय केले ते आधी सांगावे. काँग्रेससोबत आलेले एक ना धड भाराभर चिंध्या. यांना त्यांची जागा दाखवणार, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर भाष्य करताना राणे म्हणाले, 'काँग्रेसकडे आता काय राहिलेच नाही. नितीशकुमार हे मोठे आणि जेष्ठ नेते आहेत. नितीश कुमार यांना माहीत आहे की कोणासोबत राहिलो तर देशाची प्रगती होईल. त्यांना माहिती आहे की, देशाचे प्रश्न सोडविण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत आले तर अधिकचे काम करता येईल'.

अयोध्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावर राणे म्हणाले, ' उद्याचा सण हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा क्षण आहे. गेले अनेक वर्ष भारतीयांच्या मनात शल्य होतं, पण कोणीच हा विषय हाती घेतला नाही. मात्र पंतप्रधान मोदींनी तो विषय हाती घेतलाय. त्यानंतर तो यशस्वी करून दाखवला. उद्या ते स्वतः प्राणप्रतिष्ठापना करत आहेत. पंतप्रधान मोदींनी आर्थिक प्रगती बरोबरच सांस्कृतिक आणि धार्मिकतेला चालना दिली'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT