मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. आरक्षणासाठी मुंबईत भव्य पद्धतीचे आंदोलन केलं जाणार आहे. याच दरम्यान आपण मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यास तयार करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चेची तयारी दर्शवली असली तर मनोज जरांगे पाटील मात्र सरकारला एकच सवाल करत आहेत, तो म्हणजे सगे सोयऱ्यांचं काय केलं? (Latest News)
तुम्ही मागणी पूर्ण करीत नाही म्हणून मुंबईकडे निघालोय. जर तुम्ही मागणी पूर्ण केली तर गुलाल उधळायला येऊ नये का? असं म्हणत दुसऱ्या दिवशीही मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे आगेकूच सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय. काल अंतरवाली सराटीहून निघालेलं मराठ्यांचं वादळाची आजही मुंबईकडे आगेकूच सुरूच राहिली. आतापर्यंत सरकारला (Government) खूप वेळ दिला. आता मागणी मान्य केल्याशिवाय माघार घेणार नाही, असं पुन्हा सांगत आमची दारे सताड उघडी असल्याचंही मनोज जरांगे यांनी सरकारला सांगितले. इतकेच नाही तर मागणी मान्य केली नाही आणि केली तरीही मुंबईला जाणारचस असा इशारा त्यांनी दिला.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने काय केलं असा पुन्हा सवाल उपस्थित केला. सगेसोयरे हा अध्यादेश काढणार होते. अद्यापपर्यंत काढला नाही. ज्या ओळी सांगितल्या होत्या त्याही ओळी घेतल्या नाहीत. मग नेमकं काय केलं असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. २० जानेवारीपासून मुंबईकडे मराठे जाणार यावरून मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाकडून १८ तारखेपर्यंत चर्चा सुरू ठेवल्या होत्या
मात्र त्यानंतर चर्चा बंद झाल्या. दोन्हीकडूनही समजस्याने चर्चा प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना आवाहन केलं जातंय. मात्र प्रत्यक्षात चर्चा गेल्या चार दिवसात झालीच नाही. त्यामुळे आंदोलनाचे पुढचे भविष्य काय हेही कोणी सांगू शकत नाही. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना लोकशाहीने अधिकार दिला असल्याचं सांगत या आंदोलनाबाबत दोन हात दूर राहण पसंत केले असे दिसले.
दुसरीकडे राम मंदिराच्या सोहळ्याचा देशभर उत्साह सुरू आहे. त्यात मराठे महाराष्ट्रात आक्रमक झाल्यानं सरकारची कोंडी झालीय. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून मराठी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत. आज सकाळी बीड जिल्ह्यातील मातोरी इथून निघून पाथर्डीपर्यंत प्रवास झाला आणि रात्री नगरजवळील बाराबाभळी, करंजी घाट इथ मुक्काम आहे. या ८० किलोमीटरच्या प्रवासात मोठ्या संख्येनं मराठे या पायी यात्रेत सहभागी झाले. ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचा सत्कार आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यात सहभागी होत असल्या मराठ्यांची संख्या ही वाढत चालली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.