मोदींच्या दौऱ्याबाबत पवारांची टीका निरर्थक : भागवत कराड  SaamTvNews
महाराष्ट्र

मोदींच्या दौऱ्याबाबत पवारांची टीका निरर्थक : भागवत कराड

पुणे मेट्रोच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांवर टिका केली होती.

लक्ष्मण सोळुंके

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेकरांच्या आग्रहास्तव पुण्यात येतायत, त्यामुळे शरद पवार काय बोलतात यापेक्षा युक्रेनमधील (Ukraine) विद्यार्थ्यांना भारतात आणणे जास्त महत्वाचे असल्याचे मत व्यक्त करत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagvat Karad) यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार आहे.

हे देखील पाहा :

या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधानांवर टिका केली. पुणे मेट्रोचं (Pune Metro) काम अर्धवट असल्याचं सांगत उद्घाटनापेक्षा युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना देशात आणणं महत्वाचं आहे असं सांगत शरद पवारांनी पंतप्रधानांवर टीका केली. दरम्यान याच टीकेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय.

शरद पवार काय बोलतात यापेक्षा युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठी युक्रेनच्या चारही बाजूला 4 मंत्री उपस्थित असून त्यांना विद्यार्थ्यांना सोबत घेण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी सरकारकडून मंत्री पाठवण्यात आल्याचे कराड यांनी सांगितले. ते जालन्यात आले असता माध्यमांशी बोलत होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT