Parbhani Shocking Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: पोटच्या बाळाला धावत्या बसमधून फेकलं; निर्दयी मातेच्या कृत्यानं परभणीत खळबळ

Parbhani News: परभणीमध्ये आईने आपल्या बाळाला धावत्या बसमधून फेकून दिलं. या घटनेमुळे खळबळ उडाली. या प्रकरणी महिला आणि तिच्या नवऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

परभणीमध्ये आईनेच आपल्या पोटच्या बाळाचा जीव घेतला. धावत्या बसमधून या महिलेने आपल्या नवजात बाळाला फेकून दिलं. या घटनेमुळे परभणीत खळबळ उडाली आहे. ही घटना पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या बसचा पाठलाग करून बाळाच्या आईला आणि वडिलांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारामध्ये धावत्या बसमधून एका १९ वर्षीय विवाहितेने आपल्या बाळाला फेकून दिलं. पुरुष जातीच्या अर्भकाला या महिलेने बसमधून फेकून दिल्यामुळे एकच खळबळ उडाली. हा प्रकार एका शेतकऱ्याने पाहिल्यानंतर त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी बसचा पाठलाग केला आणि १९ वर्षीय विवाहिता आणि २१ वर्षीय तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतले.

आरोपी महिला आणि तिच्या नवऱ्याने पुण्यात आंतरजातीय विवाह केला होता. त्यातच ही १९ वर्षीय विवाहिता गर्भवती राहिली होती. मात्र बसमधून प्रवास करत असताना तिची बसमध्येच प्रस्तुती झाली. पुरुष जातीचे अर्भक मयत जन्माला आले होते. त्यामुळे तिने या अर्भकाला फेकून दिलं असं पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल केले. या धक्कादायक घटनेप्रकरणी पाथरी पोलिसांनी नवरा-बायकोविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मृत अर्भकाला देखील ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. तसंच महिलेच्या नवऱ्याची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Engine Sound: बाईक पार्क करताच टिक-टिक आवाज का येतो? जाणून घ्या यामागील मुख्य कारण

Ganesh Festival : पुण्यात ढोल- ताशा पथकांना सरावासाठी हवी जागा; भाजपकडून महापालिकेला जागेसाठी निवेदन

Mumbai Local Train : साध्या लोकल इतकेच AC लोकलचे तिकीट दर होणार? राज्य सरकारची रेल्वे मंत्रालयाशी बोलणी सुरु

Solapur: जेवणाचा डबा घरी विसरली म्हणून परत आली, दरवाजा लावून संपवलं आयुष्य, १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येने हळहळ

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट

SCROLL FOR NEXT