Chhatrapati Shivaji Maharaj Statue Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; शिवप्रेमींकडून जाळपोळ, परिसरात तणाव

Chhatrapati Shivaji Maharaj Statue removed : कोल्हापुरातील एका गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवाना बसवण्यात आलेला पुतळा हटवण्यात आला. यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर शिवप्रेमींनी जाळपोळ केली. छत्रपती शिवरायांचा विनापरवाना बसवलेला पुतळा हटवल्याने तणाव पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील टाकवडे गावातील पुतळा पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. यानंतर शिवप्रेमींनी टायर पेटवून आंदोलन केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या टाकवडे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एका चौकामध्ये शिवप्रेमींनी अनधिकृतपणे बसवला होता. याची माहिती पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन मिळली. याप्रकरणी शिवप्रेमी, पोलीस आणि प्रांत अधिकारी यांची बैठक झाली. यानंतर बैठकीमध्ये कोणताच निर्णय न झाल्यामुळे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने सध्या गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. इचलकरंजी टाकवडे गावामध्ये येणारे रस्ते शिवप्रेमींनी बंद केले आहेत. टायर पेटून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर शिवप्रेमी रस्त्यावर उतरले. शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून जाळपोळ केली. आंदोलकांनी रस्ता अडवून टायर जाळले. आंदोलनानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी शिवप्रेमींनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच सरकारचा निषेध नोंदवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबागचा राजाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर हिट अँड रन; भरधाव वाहनाने मुलांना चिरडलं; 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT