अनाधिकृत बांधकाम परवाना, दिल्या प्रकरणी उपमहापौरांचे आंदोलन...
अनाधिकृत बांधकाम परवाना, दिल्या प्रकरणी उपमहापौरांचे आंदोलन...  दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

अनाधिकृत बांधकाम परवाना, दिल्या प्रकरणी उपमहापौरांचे आंदोलन...

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : शहराचा विकास करण्यासाठी सोबतच नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच काम हे महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर आणि आयुक्ताचे आहे. पण लातूर येथील महानगरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कारभार विरोधात महानगरपालिकेच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आले आहे. लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये रुपेश कारंजे यांना एका बांधकामाला परवानगी दिली आहे.

हे देखील पहा-

परंतु, ही जागाच अवैध असल्याने यावर बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये, असे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अनेकवेळा मनपाचे आयुक्त अमन मित्तल यांना सांगितले होते. पण त्यास आयुक्तांनी दखल घेतली नाही. सदरील जागेवरून महावितरणची लाईट सुरू आहे. उपमहापौर यांच्या मागणीच्या रेट्यामुळे परवाना रद्द केल्याचे आदेश पोस्टाने पाठवले आहे. दरम्यान या जागेवर 8 फूट उंचीच कॉलम आणि अन्य बांधकाम करण्यात आले आहे.

यामुळे आज दुपारी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी काही नगरसेवक आणि नागरिकांसह पायऱ्यावर ठिय्या मांडला होता. जोपर्यंत तेथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आजपर्यंत कोणत्याही उपमहापौर यांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले नाही. पण खुद्द उपमहापौर यांना आंदोलन करावे लागल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई! अनेक गावातील अवस्था अत्यंत बिकट

Onion Price Hike: शेतकऱ्यांना अच्छे दिन! निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वधारले; प्रतिक्विंटल मिळतोय इतका दर

Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Today's Marathi News Live : सांगलीत सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Gangadhar Gade Death : चळवळीचा लढाऊ पँथर हरपला! माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

SCROLL FOR NEXT