Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानदाराची फसवणूक; १० हजार घेऊन इसम झाला गायब

Ulhasnagar News : उल्हासनगरातील कैलास कॉलनी परिसरातील मोबाईल दुकानात एक इसम आला होते. त्याने मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो, मला कॅश पैसे हवे आहेत; असे दुकानदाराला सांगितले

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर कैलास कॉलनी परिसरात असलेल्या सिद्दिकी ब्रदर्स या मोबाईल शॉपमध्ये अडीअडचणीला मनी ट्रान्सफर करण्याची देखील सुविधा आहे. मात्र मणी ट्रान्सफर करणाऱ्या या दुकान चालकाची दहा हजाराची फसवणूक झाल्याचे समोर आले.संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

उल्हासनगरातील (Ulhasnagar) कैलास कॉलनी परिसरातील मोबाईल दुकानात एक इसम आला होते. त्याने मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो, मला कॅश पैसे हवे आहेत; असे दुकानदाराला सांगितले. त्यानुसार त्याने दहा हजार रुपयांची रक्कम अकाउंटला ट्रान्सफर झाल्याचा मॅसेज दुकानदाराला दाखविला. समोरच्या व्यक्तीने दाखविलेल्या मॅसेजवर विश्वास ठेवून दुकानदाराने त्याला दहा हजार रुपये रोख रक्कम दिले. (Fraud) हि रक्कम घेऊन सदरची व्यक्ती दुकानातून निघून गेली. 

मात्र काही काळानंतर दुकानदाराने तपासले असता अकाउंटला पैसेच आले नसल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आपल्याबरोबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या नंतर दुकानदाराने (Police) पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारीचा अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासून तपस सुरु केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा धसका, CM फडणवीसांनी सांगितला निवडणूक प्लान | VIDEO

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मुंडे कुटुंबियांची परळीत रोहित पवार घेणार भेट

Chanakya Niti : बायको तुमच्यावर खरंच प्रेम करते की नाही कसं ओळखाल?

SCROLL FOR NEXT