युक्रेन रिटर्न विद्यार्थ्यांना NEET द्यावीच लागेल - वैद्यकीय शिक्षणमंत्री  SaamTvNews
महाराष्ट्र

युक्रेन रिटर्न विद्यार्थ्यांना NEET द्यावीच लागेल - वैद्यकीय शिक्षणमंत्री

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम अनेकांना भोगावा लागलाय. त्यात भारतातून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला (Ukraine) गेलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षांविनाच भारतात परतावं लागलं. आता या विद्यार्थ्यांना नीट (NEET) परीक्षा द्यावी लागणार त्याशिवाय भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळणार नसल्याचे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) हे लातुरातील विविध विकास कामाच्या उद्घाटनानिमित्त आले होते. देशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट परीक्षा द्यावी लागते. ज्या विद्यार्थ्यांनी (Students) युक्रेनमध्ये जाऊन वैद्यकीय प्रवेश घेतला आणि सहा महिन्यांतच त्यांना परत यावे लागले त्यांना एक संधी पुन्हा उपलब्ध आहे. त्यांना पुन्हा 'नीट' हि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असणारी प्रवेश द्यावी लागेल त्यानंतरच देशात कुठेही वैद्यकीय शिक्षण घेता येईल.

वैद्यकीय शिक्षण हे व्यावसायिक शिक्षण असून मनुष्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे कायदे आहेत. त्या कायद्याच्या बाहेर जाऊन काही करणं योग्य नाही असं मत अमित देशमुखांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे युक्रेन रिटर्न विद्यार्थ्यांना भारतात किंवा राज्यात वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असल्यास नीट परीक्षेला सामोरे जावे लागणार हे नक्कीच.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classical Language Status : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? निर्णयाने काय होणार फायदा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Marathi News Live Updates : महायुतीत एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम?

Railway Employees Bonus 2024: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्राने बोनस केला जाहीर; मिळणार 'इतकी' रक्कम

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

SCROLL FOR NEXT