घराणेशाहीची परंपरा काँग्रेसने पुन्हा जोपासली - विक्रांत पाटील

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची टीका.
घराणेशाहीची परंपरा काँग्रेसने पुन्हा जोपासली - विक्रांत पाटील
घराणेशाहीची परंपरा काँग्रेसने पुन्हा जोपासली - विक्रांत पाटीलSaamTvNews सुशांत सावंत
Published On

- सुशांत सावंत

मुंबई : नुकतीच काँग्रेस पक्षांतर्गत युवक काँग्रेसची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांचे सुपुत्र कुणाल राऊत (Kunal Raut) विजयी होऊन युवक काँग्रेसच्या (Yuvak Congress) प्रदेशाध्यक्षपदी जाऊन बसले. युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सुपुत्राची निवड करून पुन्हा एकदा काँग्रेस हा घराणेशाही चालवणाराच पक्ष आहे हे काँग्रेस ने सुस्पष्ट केले आहे, असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे.

हे देखील पहा :

नेत्याचाच मुलगा नेता होईल आणि मंत्र्याचाच मुलगा युवक अध्यक्ष होईल ही परंपरा काँग्रेस ने पुन्हा एकदा जपली आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना कामाला लाऊन काँग्रेसची मतदार नोंदणी करण्याचे काम कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी केले, त्याचे स्ट्रिंग ऑपरेशन भाजयुमो ने केले होते. परंतु दोषींवर कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे पाटील म्हणाले.

घराणेशाहीची परंपरा काँग्रेसने पुन्हा जोपासली - विक्रांत पाटील
ग्राहकांनो सावधान! पुण्यात केरळ आंब्याची देवगड हापूस म्हणून होतेय विक्री

सर्वसामान्य युवांना संधी देण्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी नुसत्या पोकळ गप्पा मारतात मात्र संधी देण्याची वेळ आली की नेत्यांच्याच मुलाला संधी देतात, यावरून काँग्रेस ची घराणेशाही ची मानसिकता वारंवार स्पष्टपणे दिसून येते व त्यामुळेच काँग्रेस (Congress) चे आज अधःपतन होताना संपूर्ण देश बघत आहे.

घराणेशाहीची परंपरा काँग्रेसने पुन्हा जोपासली - विक्रांत पाटील
भारतातील एक अनोखे गाव, जिथे होळीच्या दिवशी दगड फेकून मारले जातात!

नवनियुक्त युवक काँग्रेस अध्यक्ष यांना एक विनंती मात्र नक्की करणार आहे, की ज्याप्रमाणे आपल्या वडिलांची सरकारी यंत्रणा स्वतःच्या व काँग्रेसच्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने आपण वापरलीत, आता स्वतः चां फायदा थोडासा बाजूला ठेऊन, तिच सरकारी यंत्रणा किमान महाराष्ट्रातल्या युवांच दुःख नाहीस करण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी वापरता येते का हे पाहण्याचा प्रयत्न करावा असा टोला विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी लगावला.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com