Ujjwal Nikam Saam Tv
महाराष्ट्र

Ujjwal nikam : पराभूत झाल्याने लोकांची दिशाभूल; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा ईव्हीएमवरून विरोधकांवर नेम, काय म्हणाले?

Ujjwal nikam Nikam News : सरकारी वकील वकील उज्ज्वल निकम यांनी ईव्हीएमवरून विरोधकांवर टीका केली आहे. विरोधक ईव्हीएमविरोधात रान पेटवत असल्याचं निकम यांनी म्हटलं आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात, साम टीव्ही

अहमदनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मैदान महायुतीने मारलं. विधानसा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडी ढेर झाली. महाविकास आघाडी ५० च्या जागा जिंकता आल्या नाहीत. या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीने थेट ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. विरोधकांच्या शंका उपस्थित करण्यावरून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटाने शंका घेतली. तसेच या पक्षांनी जागोजागी आंदोलन केले. विरोधकांच्या आंदोलनानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. काही लोक ईव्हीएमविरोधात रान पेटवत आहेत. मात्र, या कोणताही आधार नसल्याचे सरकारी वकील निकम यांनी म्हटलं आहे.

'निवडणूक आयोगाने या पूर्वीही सर्व पक्षाच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमची विशेष टेस्ट घेतली होती. मात्र, आज पराभूत झाल्यामुळे अशा रितीने भांडवल करणे आणि सामान्य जनतेची दिशाभूल करण योग्य नाही. त्यांच्याकडे प्रमाणभूत आधार असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल. परंतु अंदाज आणि संशयावर कुठलीच गोष्ट कोर्टात टिकाऊ धरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

ईव्हीएम विरोधात आंदोलन प्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल

ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी पंढरपूरच्या गादेगावमधील येथील १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारकडवाडी ईव्हीएमविरोधात उठाव केल्यानंतर पंढरपूरच्या गादेगावातील ठाकरे गटाचे युवा नेते रणजीत बागल, शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब बागल यांच्यासह इतर काही लोकांनी ईव्हीएमला सलाईन लावून आंदोलन केले होते. या प्रकरणी आता पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून ईव्हीएम विरोधात आंदोलन केलेल्या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

Rajasthan Sandstorm viral Video : भरदिवसा पडला रात्रीसारखा अंधार; थरकाप उडवणारं रेतीचं वादळ, VIDEO व्हायरल

Brain Stroke Symptom: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? होऊ शकत ब्रेन स्ट्रोकचं कारण, जाणून घ्या लक्षणे

SCROLL FOR NEXT