Manasvi Choudhary
पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला कुरकुरीत भजी बनवायची असतील तर तुम्ही नवीन रेसिपी ट्राय करा. फ्लॉवरची भजी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवा.
फ्लॉवरची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच ही रेसिपी बनवू शकता.
फ्लॉवरची भजी बनवण्यासाठी प्लॉवर, बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, मसाला, जिरे, कोथिंबीर, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
एका मोठ्या भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घ्या. त्यात ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.
मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा. मात्र पीठ जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
या मिश्रणात बारीक तुकडे केलेले फ्लॉवर मिक्स करा. मिश्रण चांगले एकजीव करा.
गॅसवर कढईत गरम तेलात फ्लॉवरची भजी चांगली फ्राय करून घ्या. भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.