Ujjwal Nikam Reaction On Shivsena election commissions result Saam TV
महाराष्ट्र

Ujjwal Nikam : उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पुन्हा मिळू शकतो का? उज्ज्वल निकम यांनी स्पष्टच सांगितलं

सुप्रीम कोर्टात गेल्यास उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्हासह शिवसेना पक्षाचं नाव परत मिळणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Satish Daud

Ujjwal Nikam On Shivsena : निवडणूक आयोगाने  शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच आपण लवकरात लवकर सु्प्रीम कोर्टात जाणार, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. दरम्यान, सुप्रीम कोर्टात गेल्यास उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्हासह शिवसेना पक्षाचं नाव परत मिळणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Latest Marathi News)

या संदर्भात साम टीव्हीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला असता, अतिशय स्पष्ट शब्दात उत्तरे दिली आहेत. एकदा निवडणूक आयोगाने निकाल दिल्यावर तो निकाल अंतिम असतो, मात्र अपवादात्मक प्रकरणात सुप्रीम कोर्टात हा विषय स्टँड होऊ शकतो, त्यांना दाद मागता येते, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. (Political News)

मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेल्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शिवसेनेवर त्यांचाच अधिकार कसा आहे ते सिद्ध करावे लागेल. अन्यथा निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय अंतिम आहे, असंही उज्ज्वल निकम म्हणाले. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विचार होऊ शकतो.

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतर पूर्णविराम मिळेल, तो निकाल माईल स्टोन ठरेल, त्यामुळं निवडणूक आयोगाचा निकाल हा एकनाथ शिंदे यांना मानसिक आनंद देणारा आहे. तो किती वेळ टिकेल हे सांगता येत नाही, असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

'ठाकरेंनी ठाकरे नावाचा पक्ष काढावा'

उद्धव ठाकरेंनी आता ठाकरे नावाचा पक्ष काढावा, असा सल्ला शिंदे गटाचे अर्थान शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी आतापर्यंत कधीही ठाकरे नावाने पक्ष काढलेला नाही. राज ठाकरे तसेच इतर नेत्यांनीही हे नाव वापरलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हे नाव वापरण्यास हरकत नाही, असा खोचक सल्ला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT