Latur News: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राजकीय पक्षांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असताना मोठं वृत्त हाती आलं आहे. उदगीरमध्ये शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे आम्ही आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)
लातूरच्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. या निवडणुकीचं अवघ्या तीन दिवसांवर मतदान आले आहे. याचदरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ठाकरे गटाने गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या प्रचारातून स्वतःला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीची निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू होतया. या निवडणुकीसााठी अनपेक्षित आघाडी अस्तित्वात आली. यात शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीतून वगळण्यात आले.
या निवडणुकीत शिवसेनेकडून २ जागांसाठी मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य करण्यात आली असल्याचे सोमवारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी सांगितले.
परंतु उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडी मध्ये शिवसेनेला वगळण्यात आले . त्यानंतर सोमवारी दुपारी उदगीर येथे शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना अलिप्त राहणार असल्याचे जाहीर केले.
उदगीरमधील एका विशिष्ट समाजाला महाविकास आघाडीमध्ये झुकते माप दिले जात आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय करण्यात येत आहे. केवळ पैशाच्या जोरावर महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
येत्या दोन दिवसांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून वेगळी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगून निवडणुकीच्या प्रचारापासून महाविकास आघाडीच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा स्वतःच्या ताकदीवर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले .
या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अंकुश कोनाळे, तालुकाप्रमुख कैलास पाटील, शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, विधानसभा समन्वय प्रकाश हैबतपुरे, उपशहर प्रमुख संजय मठपती, तालुका संघटक बालाजी पुरी, उपतालुकाप्रमुख महेश फुले, गोविंदराव बेंबडे, शहर उपप्रमुख व्यंकटराव साबणे, शिक्षक सेना तालुकाप्रमुख तातेराव मुंडे, दावणगांव शाखा संघटक भाऊसाहेब भंडे आदी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.