Operation Kaveri : सुदानमध्ये 'ऑपरेशन कावेरी' सुरू, 500 भारतीयांना सुखरूप बाहेर काढलं

सुदानमध्ये गृहयुद्ध, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने 'ऑपरेशन कावेरी'
Operation Kaveri
Operation KaveriSaam TV
Published On

Operation Kaveri : आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. या धोकादायक परिस्थितीत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन कावेरी' सुरू केले आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते ट्वीट करत म्हणाले आहेत की, ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भारतीय सुदानमधील बंदरावर पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

Operation Kaveri
PHOTO: गौतमीचं बॉसी फोटोशूट; चाहते घायाळ!

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट केले की, "सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू आहे. जवळपास 500 भारतीय सुदानमधील बंदरावर पोहोचली आहेत. आणखी भारतीय मार्गावर आहेत. आमची जहाजे आणि विमाने त्यांना परत आणतील. सुदानमधील आपल्या सर्व बांधवांना मदत करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.''

आज याआधी फ्रान्सने 28 देशांतील 388 लोकांना सुदानमधून बाहेर काढले आहे. या लोकांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे. भारतातील फ्रेंच दूतावासाने ट्वीट केले की, 'फ्रेंच बचाव कार्य सुरूच आहे. काल रात्री 28 देशांतील 388 लोकांना दोन लष्करी उड्डाणांच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे.

Operation Kaveri
Monalisa Latest Photos : चाळिशीतही मोनालिसाच्या सौंदर्याला तोड नाही

यापूर्वी सौदी अरेबियाने 157 लोकांना बाहेर काढले होते. या लोकांमध्ये 91 सौदी नागरिकांचा समावेश आहे, याशिवाय इतर देशांतील लोकांचाही समावेश आहे. सुदानमध्ये 15 एप्रिलपासून लष्करप्रमुख अब्देल फतेह अल-बुरहान यांच्या शाही फौजा आणि त्यांचे उपनियुक्त मोहम्मद हमदान डॅगलो यांच्या समर्थकांमध्ये युद्ध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com