Maharashtra Teacher Transfer
Maharashtra Teacher TransferSaam TV

Maharashtra Teacher Transfer : शिक्षकांच्या बदल्या होणार बंद? शालेय शिक्षणमंत्री म्हणाले...

भविष्यात शिक्षकांच्या बदल्या बंद होणार? दीपक केसरकर म्हणाले...
Published on

Maharashtra Teacher Transfer : राज्याच्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भविष्यात शिक्षणाच्या बदल्या न करण्याबाबत विचार सुरु आहे. याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे.

मात्र निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या थांबवलेल्या नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आगामी काळात शिक्षकांच्या बदल्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Teacher Transfer
PHOTO: गौतमीचं बॉसी फोटोशूट; चाहते घायाळ!

काय म्हणाले दीपक केसरकर?

दीपक केसरकर म्हणाले की, ''माध्यमिक शाळेमध्ये एका शाळेत आयुष्यभर शिक्षक शिकार असतात. चांगल्या दर्जाचे विद्यार्थी निर्माण करत असतात. फक्त सरकारी शाळेत बदल्या होतात. यातच या बदल्या करणं योग्य आहे की नाही? याच्यावर आम्ही विचार करतोय आणि हा फार मोठा धोरणात्मक निर्णय होईल.

Maharashtra Teacher Transfer
Monalisa Latest Photos : चाळिशीतही मोनालिसाच्या सौंदर्याला तोड नाही

दीपक केसरकर म्हणाले आहेत की, ''शिक्षणाचा खरा पाया हा बालपणामध्ये होत असतो. महाराष्ट्र शासनाने वेगळी चळवळ चालवली आहे. 2 लाख 60 हजार महिला बचत गट सहभागी होत असतात. पहिलं पाऊल ही मोहीम महाराष्ट्र शासनामार्फत चालवतो. ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद आहे. आता शहरात देखील ही मोहीम चालू करण्याचं ठरवलं आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com