Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : इतिहासाची पुनरावृत्ती! बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंचं मातोश्रीबाहेर जिपमधून भाषण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर ओपन जिपमधून शिवसैनिकांशी संवाद साधला.

Chandrakant Jagtap

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी आज इतिहासाची पुनरावृत्ती केली. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा जिपवर उभा राहून लोकांशी संवाद साधला होता. त्यानंतर आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी देखील मातोश्रीबाहेर ओपन जिपमधून शिवसैनिकांशी संवाद साधला.

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर आज शिवसेनेच्या खासदार, आमदारांसह प्रमुख नेत्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एक काळ होता मोदींचे मुखवटे घालून लोक सभेला जात होती, आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून मतदान मागावं लागत आहे. (Latest Marathi News)

कपटी राजकारण सुरू आहे. शिवसेना नाव चोराला दिलं गेलं, पवित्र धनुष्यबाण चोरांना दिलं, आता मशालही हे काढून घेतील. परंतु शिवसेना संपवता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. असे कितीही चोर आणि त्यांचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर भगवा फडकवण्याची ताकद शिवसैनिकांत आहे असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल गेला. (Latest Political News)

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी कधी खचलो नव्हतो कधी कचणार नाही. या चोरांना धडा शिकवायचा आहे. हे शिवसैनिक त्यांना तो शिकवल्याशिवाय राहणार नाही. शिवधनुष्य पेलायला दाकद लागते. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता, काय झालं होतं? तुम्ही धनुष्यबाण घेऊन मैदानात या, मी मशाल घेऊन येतो असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT