Uddhav Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : 'धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही' उद्धव ठाकरेंचं मातोश्रीबाहेर शिवसैनिकांना संबोधन

Uddhav Thackeray : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली.

Chandrakant Jagtap

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटाला आव्हान दिलं आहे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवधणुष्य चोरीला गेलंय, चोरांना धडा शिकवल्याशिवर राहणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाशिवरात्रच्या आदल्या दिवशी शिवधनुष्य चोरीला गेलेलंय, धनुष्यबाण चोरणाऱ्या चोराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्या चोरांना आज आव्हान देतोय, निवडणूक घ्या, तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

यावेळी उद्धव ठाकरेनी शिवसैनिकांना देखील आवाहन केले. 'सर्वांनी आता गल्लीबोळ्यात प्रचार करायचा आहे, महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवणारे आणि दिल्लीचे तळवे चाटणारे शिवसैनिक असू शकत नाहीत. दोन महिन्यात निवडणूक लागू शकते, तयारी लागा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणूक आयोगाने धणुष्यबाण आणि शिवसेना शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयानंतर आज मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांसह प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीआधी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळचा मोठा निर्णय! लवकरच चीज अन् आईस्क्रीम बाजारात आणणार; शेतकऱ्यांनाही दिलासा

Maharashtra Live News Update: मतचोरी करून भाजप सत्तेत; माजी मंत्री महादेव जानकर यांचा आरोप

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचा सिंचन घोटाळा लपवला, PM मोदींनी दिला पाठिंबा, मुख्य अभियंताचे गंभीर आरोप |VIDEO

Pimpri Chinchwad : गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर, डीजेचा दणदणाट; पिंपरी चिंचवडमधील ४० मंडळांवर कारवाई

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात ही एक वस्तु दान करा; पैशांची तंगी आणि पितृदोष होतील दूर

SCROLL FOR NEXT