Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

MVA News: दिल्ली दौरा फळला, विधानसभेत मविआचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडेच?

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत मविआचं नेतृत्व कोण करणार याचा निर्णय अखेर झालाय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मविआचे प्रचारप्रमुख असणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलीय.

Vinod Patil

मविआचा मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून वाद संपला नसला तरी काँग्रेसनं यावर तोडगा काढल्याची माहिती समोर आलीय. आगामी विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढवण्यास काँग्रेस हायकमांडनं सहमती दिल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलीय.

त्यामुळे दिल्लीचा दौरा उद्धव ठाकरेंना चांगलाच फळल्याचं दिसतंय. कारण उद्धव ठाकरे दिल्ली दौ-यावरून आल्यानंतर काही दिवसांतच काँग्रेस हायकंमाडचं मतपरिवर्तन झाल्याचं दिसतंय. मविआत निवडणुकीतल्या नेतृत्वावरून नेमकं काय ठरलंय ते जाणून घेऊ...

उद्धव ठाकरेच मविआचे प्रचार प्रमुख -सूत्र

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करू शकते. मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंचं नाव आताच जाहीर होणार नाही. यातच मुख्यमंत्री कोण असणार हे विधानसभा निवडणुकीनंतर ठरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मविआ काळात केलेल्या कामामुळे प्रचाराची धुरा ठाकरेंकड्न केला जाईल. काँग्रेस हायकमांडची राज्यातील काँग्रेस नेत्यांना माहिती देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र यासंदर्भात हायकमांडच्या कोणत्याही सूचना नसल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी केलाय.

मविआचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेली कामं आणि उत्तमरित्या त्यांनी पार पाडलेल्या जबाबदारीमुळे त्यांच्याकडेच प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी देण्याची मविआची रणनीती असल्याचं कळतंय. याच चांगल्या कामांचा दाखला देत दिल्लीतल्या दौरयत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून आपल्या मित्र पक्षांनाच टोला लगावला होता.

ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र मविआत ठरल्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उघडपणे सांगत असतात. मात्र निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी नेतृत्वाचा चेहरा असणं गरजेचं आहे. आणि उद्धव ठाकरेंनीच मविआचं यापूर्वी नेतृत्त्व केल्यामुळे त्यांचा चेहरा जनतेला सर्वाधिक परिचयाचा आहे. त्यामुळेच निदान प्रचारप्रमुख म्हणून का होईना त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणं ही मविआची गरज मित्र पक्षांनी ओळखल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT