Supreme Court hearing begins today to decide the future of Shiv Sena's bow and arrow symbol  saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray vs Shinde: ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

Uddhav Thackeray vs Shinde: पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबत करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेंकडून मुकुल रोहतगी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर बाजू मांडली.

Bharat Jadhav

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. पक्ष आणि चिन्हाबाबत अर्ज दाखल करणं आता बंद करून यावर निर्णय निघाला पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलंय. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याबाबत अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यावर आज सुनावणी झाली.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील, असं सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असं सांगितलं. आता या प्रकरणाची सुनावणी ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकाआधी धनुष्यबाण कोणाच्या हातात जाणार हे कळणार आहे. (Thackeray or Shinde? Who Will Hold the Bow and Arrow Symbol)

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मुख्य याचिकेवर ऑगस्टमध्ये सुनावणी घेतली जाईल, असं न्याय‍धीशांनी सांगितले. पुढील २-३ दिवसांत ऑगस्टमधील सुनावणीची तारीख देऊ असं कोर्टाने सांगितलं. जर ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणावर निकाल येण्याची शक्यता असल्याचं ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निकालाआधी झाल्या तर जैसे थे परिस्थिती असेल असं त्यांनी सांगितले.

सुनावणीत काय घडलं?

आता अर्ज दाखल करणे हे बंद करून हे प्रकरण जे २ वर्षापासून प्रलंबित आहे. त्याची सुनावणी ऑगस्टमध्ये घेऊ असं सुप्रीम कोर्टाने सांगितले. कपिल सिब्बल यांनी ऑगस्टमधील तारीख मागितली होती. त्यावर उत्तर देताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, १-२ दिवसांत वेळापत्रक पाहून ऑगस्टमधील तारीख देण्यात येईल. ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाल्यास पुढील ३ महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागू शकतो, असं वकिलांनी सांगितलं. या प्रकरणाला २ वर्ष झाली असून त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असे संकेत कोर्टाने दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

Numerology: सप्टेंबर महिना 'या' मूलांकासाठी ठरेल लकी, स्वप्न होतील पूर्ण

Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

Maharashtra Politics: मोठी बातमी! कोकणातील बडा नेता भाजपच्या गळाला; उद्या थाटामाटात होणार पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT