Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

"उद्धव ठाकरेंनी आता आपण सेना नेते नव्हे, तर मुख्यमंत्री आहोत हे लक्षात ठेवावं"

'संजय राऊत यांनी आमच्यावर प्रश्न उपस्थित करण्याएवढे ते मोठे नाहीत.'

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता ते शिवसेना नेते आहेत हे विसरून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हे लक्षात ठेवावे असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं. ते म्हणाले, राणा दापत्यावर झालेले आरोप हे खरे की खोटे हे ठरविण्याचा अधिकार माझा नाही.

ते म्हणाले, सीआयएसएफचे पोलीस उपस्थित असताना, झेड सेक्युरिटी असताना, महाराष्ट्र पोलीस असताना शिवसैनिक किंवा समाज कंटकांनी दगड कसा फेकला, दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला त्याच वेळी का पकडले नाही. याची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने आणि लोकसभा अध्यक्षकांनी घेतली असल्याचंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलं.

एखाद्याने रायफलने हल्ला केला आणि जखम झाली नाही तर तो हल्ला होवू शकत नाही का? त्यामुळे जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून कलम लागू शकत नाही का? हल्ला झाला हे सत्य आहे. गल्यांमध्ये जशी भांडणं असतात तशा मारामाऱ्या राज्यात सुरू आहेत त्यामुळे अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र करायचा आहे का ? असं म्हणतील असही ते म्हणाले.

महाराष्ट्राची बदनामी थांबविण्याचा अधिकार हा राज्याच्या सरकारकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी भोंग्याच्या विषयात बैठक लावायची आणि स्वताच त्या बैठकीला उपस्थित राहायचे नाही असं होत नसते त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ते शिवसेना नेते आहेत हे विसरून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हे लक्षात ठेवावे असा टोलाही पाटील यांनी लगावला.

तसंच मुख्यमंत्र्यांनी शिवराळ भाषा वापरण्यापेक्षा त्यांचे इतर नेते कुठे आहेत, ते कुठं पडलेत हे शोधून काढावे. संजय राऊत यांनी आमच्यावर प्रश्न उपस्थित करण्याएवढे ते मोठे नाहीत. नवनीत राणा ह्या अपक्ष खासदार आहेत. त्या त्याची त्याची ऍक्टिव्हिटी करत आहेत त्यामुळे त्यांच्या एकटिव्हीला समर्थन करणे किंवा विरोध करण्याचे कारण नाही. अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात फारसे कोणी गाभिर्याने घेत नाही. याचे हातवारे त्याचे बोलणं हे मजेशीर असत, पण अब्दुल सत्तर यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर हिंदू समाज त्याची दखल घेईल

माज्यावर बोलल्याशिवाय तुम्ही छापत नाही. त्यामुळे ते माज्यावर बोलतात. शरद पवार पुण्यातील वसंतराव व्याख्यानमालेत अस म्हणाले होते "मी काँग्रेस मध्ये जाण्यापेक्षा तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन अस बोलले होते, त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांच्या तोंडाला डांबर का फासले नाही, ते हिमालयात का गेले नाहीत ? हे जयंत पाटील यांनी त्यांना विचारावे राष्ट्रवादीची कोल्हापुरात सभा झाली. पण याच कोल्हापुरात 2014 च्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 8 हजार मते फक्त मिळाली. त्यामुळे ते कोणत्या मुद्यावर गमजा मारता असा टोलाही त्यांनी यावेळी राष्ट्रवादीला लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT