पेट्रोल-डिझेल दरवाढीवर PM नरेंद्र मोदी पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्राने एक्साईज ड्यूटी कमी केली आहे.
PM Modi/ CM
PM Modi/ CMSaam TV
Published On

नवी दिल्ली : कोरोना (Corona) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. आपण कोरोना महामारी विरोधातील लढाई लढत राहणार असल्याचं सांगतानाच, मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देणार असल्याचं मोदी म्हणाले. तसंच मुलांसाठी शाळांमध्ये लसीकरण (Vaccination) करण्यावर भर देण्याच्या सूचनाही मोदींनी केल्या.

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरवाढीवरुन महाराष्ट्र तसंच पश्चिम-बंगाल या राज्यांना पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची विनंती पंतप्रधान मोदी य़ांनी केली. सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती सुरु आहे. या युद्धामुळे पुरवठा साखळी संकटात असून हे संकट वाढताना दिसत आहे. हे वैश्विक संकट असल्यामुळे केंद्र आणि राज्याच्यामंध्ये ताळमेळ पाहिजे या दोघांमध्ये सहकाराची भावना हवी.

पेट्रोल-डिझेल किंमतीचा बोजा कमी करण्यासाठी केंद्राने एक्साईज ड्युटी (Excise Duty) कमी केली आहे, तसंच यावेळी आपण राज्यांना देखील पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्यासाठी आग्रह केला होता. त्यामुळे काही राज्यांनी कर कमी केले असले तरी काही राज्यांनी इंधनावरील कर कमी केले नाहीत. त्यामुळे ज्या राज्यांनी कर कमी केला नाही. त्या राज्यातील लोकांना कमी दराचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे राज्यातील लोकांवर अन्याय झाल्याचंही मोदी म्हणाले.

इंधनाचे दर आणखी वाढल्यामुळे कर कमी करणाऱ्या राज्यांमधील लोकांवरती अन्याय होत आहे. असं सांगतानाच त्यांनी महाराष्ट्राच्या शेजारील राष्ट्रांनी कर कमी केल्यामुळे त्या राज्यातील जनतेला फायदा झाला आहे. गुजरात, कर्नाटक (Karnatak) या राज्यांनी कर कमी केल्यामुळे त्यांचे नुकसान झालं त्यांचा कर बुडला. मात्र, जनतेसाठी त्यांनी ते नुकसान सोसलं असं सांगतानाच त्यांनी महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या करापासून ६ महिन्यात ३,५०० करोड ते ५,५०० करोड पर्यंत टॅक्स गोळा केल्याचं सांगितलं. दरम्यान आपण मागील नोव्हेंबरमध्ये वॅट कमी करण्याची घोषणा केली होती. तरी ज्या राज्यांनी अजून तो कमी केला नाही त्यांनी नागरिकांच्या भल्यासाठी आता तरी इंधन दर कमी करावे असही मोदी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com