Uddhav Thackeray Shivsena Seatback News Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : ऐन झेडपी निवडणुकीत शिंदेंचा ठाकरेंना झटका; बड्या नेत्यासह ३०० जणांनी सोडली साथ

Uddhav Thackeray Shivsena Seatback News : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे ३०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Alisha Khedekar

  • महापालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांचे वेध

  • वेंगुर्ल्यात ठाकरे गटाचे ३०० कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

  • यशवंत परब यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा प्रवेश

  • जिल्हा परिषद निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का

Uddhav Thackeray Shivsena Seatback News राज्यात काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकांचा धुरळा उडाला. या निवडणुकीत भाजप पक्ष सर्वात आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या नंबरवर आघाडीवर पाहायला मिळाली. तसेच ठाकरे बंधूंना या निवडणुकीत फारसे यश आलेले नाही. महापालिकेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकांच्या तोंडावर आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मिळाला आहे.

वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे गटाचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह सुमारे ३०० पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. युवा सेनेचे तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता परब, माझी शहर प्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासहित अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

सावंतवाडी- वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला वेंगुर्ल्यामध्ये मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकांनंतर आता जनतेचे लक्ष जिल्हा परिषद निवडणुकांवर लागले आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट

Face Care: उन्हाळ्यात चेहरा डल आणि काळा पडलाय? मग वापरा ५ मिनिटांत तयार होणारा हा फेसपॅक

मोठी बातमी! अखेर LPG ला पर्याय मिळाला, पुण्यात नव्या गॅसची निर्मिती

Maharashtra Live News Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Skin Care : १० मिनिटांत पायांचा काळपटपणा होईल गायब, वापरा फक्त या ३ स्टेप्स

SCROLL FOR NEXT