Uddhav Thackeray Nashik Visit  Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Politics : भाजप-शिंदेंकडून खिंडार, उद्धव ठाकरे स्वत: मैदानात, डॅमेज कंट्रोल करणार का?

Uddhav Thackeray Nashik Visit : भाजप-शिंदे गटाच्या गळतीमुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे. यावर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार असून पक्षात मोठे बदल अपेक्षित आहेत.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray News : विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली. एकनाथ शिंदे आणि भाजपने ठाकरेंच्या सेनेला खिंडार पाडले. कोकण, मुंबईसह नाशिकमध्येही अनेक शिलेदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. मागील काही दिवसांत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरेंचे सैनिक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरणार आहेत. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटात मोठे संघटनात्मक बदल होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. पक्ष कार्यकरणीमध्येही फेर रचना होणार आहे.

वर्षाअखेरीस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेतून जिल्ह्यातील अनेकांनी साथ सोडली. मनपामध्ये ठाकरेंकडे फक्त चार नगरसेवक राहिले आहेत. बडबुजार, सुनिल बागुल, मामा राजवाडे यांच्यासारख्या दिग्गजांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. महायुतीने नाशिकमध्ये ठाकरेंची सेना खिळखिळी केली. आता ठाकरे स्वत: मैदानात उतरणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमधील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

उद्धव ठाकरे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मतदारसंघ निहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतील, त्यानंतर पक्षामध्ये मोठे बदल होणार आहेत.

नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पाडण्यात आले आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या फक्त ४ माजी नगरसेवक आणि मोजके पदाधिकारी शिल्लक आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये जाण्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा डॅमेज कंट्रोलसाठी नाशिक दौरा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर तरी पक्षाला लागलेली गळती थांबणार का? पाहणं ठरणार महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

सुक्या भाजीत मीठ जास्त झालंय? या ट्रिकने स्वाद होईल एका मिनिटात ठीक

कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवून महिला, पुरुषांवर उपचार

Maharashtra Politics: काका-पुतण्याची दिलजमाई? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी एकत्र?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

SCROLL FOR NEXT