Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Supreme Court
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Supreme Court  saam tv
महाराष्ट्र

'व्हीप' चा वाद पाेहचला सर्वाेच्च न्यायालयात; सभापतींच्या निर्णयाविराेधात याचिका दाखल

Siddharth Latkar

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपचे (BJP) राहूल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचा विजय (Victory) झाला. त्यानंतर नार्वेकर यांना प्राप्त झालेल्या पत्रानूसार त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे भरत गाेगावले यांना प्रताेद म्हणून मान्यता देत त्यांनी सादर केलेल्या पत्राचे वाचन केले. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या या निर्णया विराेधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. (eknath shinde latest marathi news)

भाजपचे राहूल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत रविवारी विजय झाले. या निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे सुनील प्रभु यांनी अध्यक्षांना पत्र देत शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हीप झुगारुन पक्षा विराेधात मतदान केल्याचे नमूद केले. तसेच गाेगावले यांचा दावा तांत्रिक दृष्टया याेग्य नसल्याचे म्हटले हाेते.

राहूल नार्वेकर हे अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या पत्राचे सभागृहात वाचन केले. ते म्हणाले शिवसेना विधीमंडळाचे प्रताेद भरत गाेगावले यांच्या पत्रानूसार शिवसेना विधीमंडळातील 16 सदस्यांनी पक्षाच्या आदेशा विराेधात मतदान केले आहे. त्या 16 सदस्यांची नाेंद घेण्यात आली आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या निर्णया विराेधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने आज (साेमवार) सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने येत्या 11 जूलैला आज दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतली जाईल असे म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: एक महिना साखर खाणं करा बंद; शरीराला होतील अनेक फायदे

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

SRPF जवानाची किरकाेळ कारणावरून निर्घृण हत्या; किरकोळ कारण, पण घडलं भयंकर

Gurucharan Singh Fees : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी गुरुचरण सिंह किती मानधन घ्यायचा ?

Today's Marathi News Live : खरी शिवसेना शिंदेंकडे; अमित शहांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख

SCROLL FOR NEXT