Himachal Pradesh Accident News: भीषण दुर्घटना! शाळकरी मुलांची बस दरीत कोसळली, १६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

हिमाचल प्रदेशमध्ये एक मोठा झाला आहे. कुल्लू येथे एक बस दरीत कोसळली. या बसमध्ये ४५ प्रवासी होते.
Himachal Pradesh Accident News
Himachal Pradesh Accident News Saam Tv

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे भीषण बस अपघात (Accident) झाला आहे. साईंज घाटात सोमवारी सकाळी बस दरीत कोसळली. बसमध्ये एकूण ४५ लोक प्रवास करत होते. यापैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये काही शाळकरी मुल होती. ही मुल शाळेसाठी जात होते. बस जात असताना दरीत कोसळली.

ही बस हिमाचल प्रदेश येथील साईंज खोऱ्यातील शेनसार येथून साईंजच्या दिशेने येत होती. यावेळी जंगला नावाच्या ठिकाणी चालकाचा बसवरील नियंत्रण सुटले, यात ती बस दरीत कोसळली. (Himachal Pradesh Accident News)

Himachal Pradesh Accident News
उद्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात धो-धो बरसणार; हवामान विभागाची माहिती

शाळेच्या दिशेने जाणाऱ्या या बसमध्ये स्थानिक लोकांव्यतिरिक्त शाळकरी मुलेही प्रवास करत होते. बसच्या अपघाताची (Accident) माहिती मिळाली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. घटनास्थळी मदत सुरु आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Himachal Pradesh Accident News
महाविकास आघाडीला घटक पक्षाकडून आजही बसणार झटका?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर ट्विट केले आहे. 'हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. मला आशा आहे की जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील,' अस ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना मदत कत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Himachal Pradesh Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com