Leaders from Thackeray Sena, Shinde Sena and NCP come together in Barshi, Solapur, sparking fresh political debate in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

सर्वात मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात खळबळ, अखेर दोन्ही शिवसेना एकत्र

Thackeray Shinde Alliance Against BJP: एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले ठाकरेसेना आणि शिंदेसेना एकत्र आलीय.. मात्र हा युतीचा नवा प्रयोग कुठं झालाय ?आणि या युतीवरुन कसं राजकारण रंगलंय

Bharat Mohalkar

अकोट आणि अचलपूर नगरपालिकेत सत्तेसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या एमआयएमसोबत भाजपनं घरोबा केला.. आणि आता त्याचं पुढचं पाऊल पडलंय ते सोलापूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत... दोन्ही पवारांपाठोपाठ आता सोलापूरच्या बार्शीत भाजपला रोखण्यासाठी कट्टर विरोधक असलेले ठाकरेसेना आणि शिंदेसेनेनं एकीची वज्रमूठ आवळलीय.. बार्शीचे भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याविरोधात दिलीप सोपल यांनी नव्या युतीचं समीकरण जुळवलंय..

हा बॅनर नीट पाहा....ठाकरेसेनेचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी भाजपला रोखण्यासाठी शिंदेसेना, आणि दोन्ही राष्ट्रवादीसोबत युतीची घोषणा केलीय.. त्याचा बॅनर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय.. या बॅनरवर उद्धव ठाकरेंसोबत, एकनाथ शिंदे, शरद पवारच नाही तर अजित पवारांचाही फोटो आहे.... मात्र बार्शीतील युती ही अधिकृत नसल्याचं दावा संजय राऊतांनी केलाय.. तर महायुतीतील पक्षच विरोधी पक्षासोबत युती करत असल्यानं भाजपनं शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीच्या धर्माची आठवण करुन दिलीय.

खरंतर भास्कर जाधवांनी मुंबई महापालिकेत शिंदेंनी ठाकरेंना महापौरपदासाठी पाठींबा देण्याचं आवाहन केलं होतं.. मात्र हा प्रस्ताव संजय राऊतांनी तातडीनं फेटाळून लावला होता. आता तेच समीकरण सोलापूरच्या बार्शीत पाहायला मिळतंय.. त्यामुळे जनतेचं मत जाणून घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदेसेनेकडून लिटमस टेस्ट घेतली जातेय का अशी चर्चा रंगलीय....त्यामुळे सर्व प्रादेशिक पक्षांनी हा प्रयोग सोलापूरच्या बाहेरही राबवल्यास भाजपपुढे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: सूख-समृद्धी येण्याचा योग; 'या' तीन राशींची होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Car-Truck Accident: SUV कार आणि ट्रकचा भीषण अपघात; धडकेत कारचा चक्काचूर,६ जणांचा जागीच मृत्यू

Congress: काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ७५ नेत्यांनी सोडली 'पंजा'ची साथ, राजकारणात खळबळ

काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; स्वर्ग पांढऱ्या चादरीखाली, पर्यटनाला बहर

Maharashtra Live News Update: पुण्याचा महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष कधी ठरणार? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT