Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Speech : चंद्रचूड साहेबांना सदबुद्धी मिळायला पाहिजे होती; उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत टोला,VIDEO

Uddhav Thackeray Speech in Solapur : उद्धव ठाकरे यांनी माजी सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांना टोला लगावला. ठाकरेंनी यावेळी महायुतीवर जोरदार टीका केली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : उद्धव ठाकरे यांनी सोलापुरातील जाहीर सभेत शिवसेना फुटीवरून न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाकरेंनी शिवसेना फुटीच्या निर्णयावरून माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना टोला लगावला आहे. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

देशाचे पंतप्रधान देशाचा कारभार सोडून मतांचा जोगावा मागण्यास महाराष्ट्रात फिरत आहेत.

स्वतःच्या चेहऱ्यावर मत मागायला लाज वाटत असल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावर मत मागत आहेत.

काही वर्षांपूर्वी मोदी यांनी नोटबंदी केली होती. त्यानंतर महाराष्ट्राने मोदींची नाणेबंदी केली आहे.

महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी चालत नाही. आज मोदी नांदेडमध्ये होते. मी ही तिथेच होतो. सुदैवाने त्यांचं दर्शन झालं नाही. मोदींनी मला आवाहान दिलं आहे.

नरेंद्र मोदींचे भाषण लिहिणारे सुट्टीवर गेले असेल. त्यांचं टेलीप्रॉम्पटर बिघडलं असेल. शिंदेंचा टेलिप्रॉम्पटर धरण फोडणारा खेकडा आहे. राहुल गांधी यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आपण बघितलं नसेल तर मी तुम्हाला व्हिडीओ पाठवत.

मी भाजपला लाथ मारली. कारण मला घर पेटवणारं हिंदुत्व मान्य नाही. भाजपला हिंदू मुसलमान दंगे भडकवायचे आहेत. मराठी माणसांत जातीजातीत दंगे पेटवयाचे आहेत.

आपण आता नवीन गुलाबी जॅकेट सोबत घेतलं आहे. त्यांनी मुंबईत नवाब मलिक हे उमेदवार उभे केले आहेत.

मुंबईत मोदीजी, तुम्ही येणार आहात. नवाब मलिकांना व्यासपीठावर घेणार आहात का? अजित पवार म्हणतात, नवाब मालिकांच्या प्रचाराला जाणारच.

राहुल गांधी यांनी मला बाळासाहेब यांची नकली संतान म्हणले नाहीत, ते पाप मोदींनी केलं. मोहन भागवत जामा मशीदमध्ये गेले. मोदी मशीदमध्ये जातात, चंद्राबाबूचा जाहीरनामा तुम्हाला मान्य आहे का?

तिसरे न्यायमूर्ती निवृत्त झाले. आम्ही आता न्याय कुठे यमाई देवीकडे न्याय मागायचा? चंद्रचूड साहेबांना सदबुद्धी मिळायला पाहिजे होती. मात्र आता चौथे नायायमूर्ती आले, आम्ही न्याय मागायचा कोणाकडे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT