Uddhav Thackeray Statement : 'उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के.. आता मी धक्कापुरुष झालो आहे..' असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. विभागक्रमांक ६ च्या विभागप्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती झाली. तेव्हा भाषण करताना उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा अशा सूचनाही केल्या आहेत.
'जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर आश्चर्य व्यक्त केले जाते. तसंच मलाही धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. आता मी धक्कापुरुष झालो आहे. कोण किती धक्के देतंय ते बघूयात.. यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का ज्यावेळी असा देऊ की हेच पुन्हा दिसता कामा नये', असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
'सैनिक म्हटल्यावर शिस्त आली पाहिजे. लढाई एकट्याची नाही, आपली आहे. आपल्या मुळावर घाव घालणारे सरसावले आहेत. आपल्याच लाकडाचा दांडा वापरुन त्याची कुदळ मराठी माणसाच्या मुळावर घाव घालण्याचे काम करत आहेत. तेव्हा आपण एक राहिले पाहिजे', असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी 'संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. २२ किंवा २३ तारखेला निकाल लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. सर्वांनी दिलेली कामं व्यवस्थितपणे करा. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता, जी चूक झाली ती आता चूक होणार नाही याकडे लक्ष द्या', असे म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.