Uddhav and Raj Thackeray shared the stage after 20 years during the Marathi Vijay Melava, sparking speculation of a potential political alliance in Maharashtra. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Uddhav and Raj Thackeray : शिवसेना-मनसे युती कधी होणार? राज ठाकरेंसोबत चर्चा झाली? उद्धव ठाकरेंनी सगळं सांगून टाकलं

Uddhav Thackeray and Raj Thackeray : राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र मंचावर येणं चर्चेत. युतीबाबत उद्धव ठाकरेंचं स्पष्ट वक्तव्य – योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, महाराष्ट्राचं स्वप्न साकार करू.

Namdeo Kumbhar

What did Uddhav Thackeray say about unity with Raj Thackeray? : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेनं जोर धरला. ५ जुलै रोजी मराठी विजय मेळाव्याला दोन्ही भाऊ एकत्र आले अन् राज्याच्या नव्या राजकीय युतीची चाहूल लागली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी दोन्ही भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का? याची चर्चा सुरू झाली. शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा झाली? याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेय. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, महाराष्ट्राच्या मनात आहे ते नक्की होईल, असे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, त्यामध्ये मनसे आणि शिवसेना युतीवर भाष्य करण्यात आले. (Will Shiv Sena and MNS form an alliance before local elections?)

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय? दोघांची राजकीय युती होईल काय? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमाकूळ घालत आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ.” दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसेसोबतच्या युतीवर वारंवार भाष्य केले जातेय, पण राज ठाकरेंकडून अद्याप अधिकृत यावर कोणताही प्रतिक्रिया येत नसल्याचे दिसतेय. पाहूयात मुलाखतीत राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले? (Full interview of Uddhav Thackeray on Shiv Sena-MNS alliance)

संजय राऊत यांचे प्रश्न, उद्धव ठाकरे यांची उत्तरे... पाहा मनसे-शिवसेना युतीवर काय उत्तरे दिली?

हिंदी सक्तीविरुद्ध शिवसेना आणि मनसे ... उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा 5 जुलैला काढण्याचे जाहीर झाले. संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली. या सगळ्या 20 वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्यावर एकत्र आले ...

- आम्ही एकत्र आल्यामुळे प्रॉब्लेम कुणाला आहे ?

प्रॉब्लेम कुणालाच नाही, पण काही लोकांना असू शकतो ...

- मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील, आपण का विचार करायचा?

या एकत्र मोर्चाच्या चर्चेने मराठी अस्मितेची एक लाट निर्माण झाली ... आणि या लाटेने उद्धव आणि राज यांना 20 वर्षांनंतर एकत्र आणलं ...

- आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, 'अच्छा किया आपने'. त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो.

- मला काय माहीत. ज्यांचा पोटशूळ उठलाय त्यांना विचारा. मी आनंदाकडे बघतो. मी यातली पॉझिटिव्ह बाजू बघतो.

आपण दोघे एकत्र आल्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली ...

होय, नक्कीच.

आणि त्यानंतर या मोर्चाचं रूपांतर एका विराट अशा विजयी मेळाव्यात झालं. हा विजयी मेळावा केवळ वरळीत नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला ...

- संपूर्ण देशभरात झाला. मी मघाशी सांगितलं की, महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्यं असं अजिबात झालेलं नाही. जे काही मोजके असतील त्या इतर भाषिकांनीसुद्धा आम्हाला मेसेज पाठवले किंवा निरोप पाठवले की, 'बहोत अच्छा किया आपने'. यात मुंबईतले अमराठीसुद्धा आहेत. त्यांनीही सांगितलं की, तुम्ही असं लढलंच पाहिजे. एकत्रित लढे दिले पाहिजेत.

त्या मंचावर राज ठाकरे असे म्हणाले की, बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल. तुम्हीही असं वारंवार म्हणालात की, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू. याचा अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचा?

- लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू असाच याचा अर्थ आहे.

मराठी माणसाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणं हे ठीक आहे. ते होणार ...

- आलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही कोणासाठी लढतोय? मराठी माणसासाठीच.

लोकांचा रेटा आहे की, राजकीयदृष्ट्या एकत्र यावं ...

- आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे.

यासंदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे का?

चर्चाही होईल ... पण त्याआधी आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. हेही नसे थोड़के! हे खूप मोठे आहे. म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटले की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: -मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये वाहतुक कोंडी

Ind Vs Eng 4th Test : टीम इंडियाला सलग दोन धक्के, लागोपाठ दोन स्टार खेळाडू संघातून बाहेर; गिलचं टेन्शन वाढलं

Saving Scheme : रोज करा १२१ रुपयांची बचत अन् मुलीच्या लग्नापर्यंत २७ लाख जमा होतील; कशी आहे LICची खास 'कन्यादान पॉलिसी'

Security Tips: तुमचे बँकिंग आणि सोशल अकाउंट 'असे' सुरक्षित ठेवा, सरकारने सांगितले महत्वाचे पासवर्ड टिप्स

White Colour Saree: श्रावणात सणासुदींला नेसा खास पांढऱ्या रंगाच्या मनमोहक साडी

SCROLL FOR NEXT