Suresh Mapari leaves Shiv Sena (UBT) and heads to Mumbai with 250 supporters to join BJP in presence of Devendra Fadnavis. saam tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा मोठा दणका! बड्या निष्ठावंताने सोडली साथ, 250 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये करणार प्रवेश

Suresh Mapari Joins BJP With 250 Workers In Washim: वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी 250 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पक्षप्रवेशाचा सोहळा सुरू झाला असून नेत्यांची या पक्षातून त्या पक्षात गटांगळ्या खाण्यास आता पुन्हा सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता विदर्भातील वाशिम जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर फक्त दोनच दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश मापारी हे एकटे प्रवेश करत नसून त्यांच्यासह 250 कार्यकर्ते हे कमळ हाती घेणार आहेत.

20 गाड्यांचा ताफा अन् 250 कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना

वाशिमच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश मापारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर काल रात्रीच सुरेश मापारी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 ते 250 प्रमुख पदाधिकारी,सरपंच आणि कार्यकर्त्यांचा भला मोठा ताफा मुंबईला रवाना झाला आहे. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वीच वाशिमच्या जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे सुरेश मापारी यांच्याकडून काढून घेतली होती. त्यानंतर बालाजी वानखेडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याने सुरेश मापारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच ठाकरे गटाचे स्थानिक खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत राजकारणावर सुरेश मापारी मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे बोलले जात होते, याआधी सुरेश मापारी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

सुरेश मापारी हे वाशिम जिल्ह्यातील दिग्गज नेते मानले जातात, त्यांनी याआधी माजी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांसारखी अनेक महत्वाची पदे सांभाळली आहेत. वाशिमच्या ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे मोठे जाळे त्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा धक्का ठाकरे गटाला बसेल असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक आकर्षण, पवना तलावाने वेढलाय 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: वादळी पावसाने मेंढपाळांचे कंबरडे मोडले, लाखणगावात पशुधनासह संसार उघड्यावर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले? एका मिनिटात असे करा चेक

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंनी वीकेंडला मारली बाजी; 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, आतापर्यंत किती कोटींची कमाई?

मोठी बातमी! एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल, अमित शाहांची तातडीने भेटणार, राज्यात नेमकं काय सुरू?

SCROLL FOR NEXT