Uddhav Thackeray Saam
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची धाकधूक वाढली! मातोश्रीवरील बैठकीआधीच 'हा' खासदार 'नॉट रिचेबल'

Eknath Shinde Operation Tiger Maharashtra : उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या खासदार बैठकीपूर्वी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

सचिन बनसोडे, शिर्डी प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पक्षाच्या सर्व खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीपूर्वीच शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे सकाळपासून 'नॉट रिचेबल' असल्याचे समोर आलेय. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे. (Shiv Sena UBT Latest News)

दुपारी साडेबारा वाजता बैठक, सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश

उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता सर्व खासदारांना बैठकीसाठी बोलवले आहे. ऑपरेशन टायगरची राज्यात चर्चा सुरू असताना ठाकरेंकडून या बैठकीसाठी सर्वच खासदारांना उपस्थित राहण्याचे कडक आदेश देण्यात आले होते. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांमुळे धाकधूक वाढली

सध्या राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू आहे. या अंतर्गत ठाकरे गटात मोठी पडझड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या या तातडीच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. असे असतानाच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा फोन सकाळपासून बंद येत असल्याने राजकीय चर्चांना प्रचंड वेग आला आहे.

वाकचौरे बैठकीला येणार की मोठा झटका देणार?

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा फोन सकाळपासून बंद असल्याने ते मुंबईतील पक्षप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही? याबाबत आता मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. वाकचौरे यांच्या या 'नॉट रिचेबल' होण्यामागे नक्की काय कारण आहे? ते काही तांत्रिक कारणामुळे संपर्काबाहेर आहेत का? राज्यात पुन्हा काही मोठा राजकीय उलटफेर होणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Symptoms: शरीराच्या या 3 भागांमध्ये सर्वात आधी दिसतात हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या 10 वर

संतापजनक कृत्य! सहकाऱ्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला,पोटात हवा गेल्यानं कामगाराचा मृत्यू

Running Benefits: वजन कमी करायचं आहे? मग दररोज ३० मिनिटं धावण्याची सवय लावा, शरीराला होतील हे ७ फायदे

Rain Health Tips: पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात?

SCROLL FOR NEXT