CM Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

नामर्दांच हिंदूत्व आम्हाला शिकवू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या सभेसाठी उद्धव ठाकरे मुंबईतून औरंगाबादसाठी रवाना झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : गेल्या काही दिवसापासून शिवसेनेकडून (Shivsena) औरंगाबादमधील सभेची तयारी सुरू आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी उद्धव ठाकरे मुंबईतून औरंगाबादसाठी रवाना झाले आहेत. (Uddhav Thackeray Sabha in aurangabad)

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून आता सभेच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सभास्थळी येणाऱ्यांची कसून चौकशी आणि तपासणी करण्यात येत आहे. सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तब्बल १८०० पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर सीसीटीव्ही कॅमेरांचे लक्ष सभास्थळी असणार आहे.

सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये शिवसेनेने पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर 'होय संभाजीनगरच' अस लिहिण्यात आले आहे. यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेत काय बोलतात हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे. सभेच्या ठिकाणी आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मोठी गर्दी केली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे भाषण केले. यावेळी त्यांंनी विरोधकांवर टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचले आहेत. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची भाषणं सुरु आहेत.

संजय राऊत बोलताना म्हणाले, ३७ वर्षापूर्वी कोणाला वाटलं देखील नसेल की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्याची आजची ही विराट सभा दिल्लीला हलवल्याशिवाय राहाणार नाही.

देशात अनेक प्रश्न आहेत, पण त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. महागाईवर प्रश्न विचारला तर ज्ञानवापी मशिदीवर बोलतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आज सकाळी मला अनेक काश्मिरी पंडीतांचे फोन आले, त्यांनी मला उद्धव ठाकरेंना आमच्यासाठी बोला, असंही राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जर तुमत्यामध्ये प्रमाणिकपणा असेल तर नुसतं नामांतर नाही तर संभाजी राजेंना अभिमान वाटेल असं शहर तयार करायचं आहे. नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहीजे. संभाजीनगर नाव करणार हे वचन बाळासाहेबांनी दिलं आहे ते पुर्ण करणार, विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राने का अडवून ठेवला, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकला तो आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे, उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे. मी पाणी प्रश्नावर बोलणार आहे, पाठ न दाखवता पाणी प्रश्न असतानाही मी जनतेसमोर जातोय, हा प्रामाणिक पणा आहे.

शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपची भूमिका देशाची भूमिका होवू शकत नाही. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली हे तुम्हाला मान्य आहे का? देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंड्यांवर लावला गेला त्याचं काय?, असा सवालही ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्रचं मुख्यमंत्री पद तेही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत...२५-३० वर्षे ज्यांना मित्र म्हणून ज्यांना मांडीवर बसवलं होतं तो उरावर नाचायला बघायला लागला आणि ज्यांच्याबरोबर भांडत होतो त्यांनी आपल्याला मान देऊन सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास करून घेण्याची आणि देण्याची साथ दिली आहे. जो मित्र होता तो हाडवैरी झाला आणि वैरी मित्र झाले आहेत, असंही ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT