Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची दिल्लीत मोदींवर टीका; महाराष्ट्रात रण पेटलं, भाजप नेता संतापला

Maharashtra Political News: उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळं भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संतापले. उद्धव ठाकरेंना दिसत नाही, चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागेल, असं ते म्हणाले.

Nandkumar Joshi

  • उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

  • भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे सडेतोड उत्तर

  • आधी तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या, बावनकुळेंचा सल्ला

बालाजी सुरवसे, धाराशीव

परराष्ट्र धोरण, अमेरिकेचा टॅरिफ बॉम्ब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा यावरून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तोफ डागल्यानंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. याशिवाय राजकीय सल्लाही दिला. जगाची आणि मोदींची तुलना करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला स्वतःचा पक्ष सांभाळावा, असा खोचक सल्ला बावनकुळेंनी दिला. ते धाराशीवमध्ये बोलत होते.

उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. तिथं ते वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आज, गुरुवारी सकाळी ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टाकलेला टॅरिफ बॉम्ब आणि पंतप्रधानांचा आगामी चीन दौरा यावरून टीकास्त्र डागलं. नरेंद्र मोदी हे जगभर फिरतात. मात्र, जगभरात आपल्या देशाचा एकही मित्र नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. याबाबत धाराशीव दौऱ्यावर असलेले भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता, त्यांनी ठाकरेंविरोधात संताप व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांना दिसत नाही. त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागेल, असे बावनकुळे म्हणाले. मोदींनी योग दिवस दिला. संपूर्ण देशाने स्वीकारला. जगानेही स्वीकारला. मोदींनी दहशतवादाच्या विरोधात लढाई उभारली. देश उभा राहिला. दहशतवादाविरोधात जग उभा राहिला. मोदींच्या पाठिशी संपूर्ण जग आहे, हे उद्धव ठाकरेंना दिसत नाही, असं बावनकुळे म्हणाले.

स्वतःचा पक्ष सांभाळा!

मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंविरोधात बावनकुळेंनी संताप व्यक्त करतानाच त्यांना राजकीय सल्ला दिला. जगाची आणि मोदींची तुलना करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष सांभाळावा. तुमच्या पक्षातील लोक दररोज शिंदे यांच्या पक्षात जात आहेत हे उद्धव ठाकरेंना दिसत नाही. त्यांना चष्म्याचा नंबर बदलावा लागेल, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Kalyan Crime : खडवली नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला; पोलिसांना वेगळाच संशय

Vastu Shastra: या ५ गोष्टी चुकूनही कोणाला भेट देऊ नका; नातं तुटण्याची असते दाट शक्यता

Divyanka Sirohi Death: रील बनवताना खाली कोसळली; लोकप्रिय अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

SCROLL FOR NEXT