Uddhav Thackeray: 
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: विरोधी पक्षनेतेपद नाही तर उपमुख्यमंत्रीपद कशाला? उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेत्याची पदे रिक्त आहेत. त्यावरून आज उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढवलाय. सरकार घाबरणारं असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Bharat Jadhav

नंबर एकला महत्त्व असतं तर नंबर २ कशाला हवं? तुम्हाला विरोधी पक्षनेते पद द्यायचे नसेल तर उपमुख्यमंत्रीपद कशाला तेही रद्द करा अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते पदावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये वाद पेटलाय. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेत्याची पदे रिक्त आहेत. त्यावरून महाविकास आघाडीकडून सरकारवर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून मविआला कोंडीत पकडणाऱ्या सत्ताधाऱ्यावर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत हल्लाबोल चढवला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत अध्यक्षांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सरकारवर शरसंधान केलं. मागील वर्षी आम्ही विरोधीपक्षनेते पदाबाबत चर्चा केली असून त्यासाठी भास्कर जाधव यांचे नाव देण्यात आलं होतं मात्र त्यावर काही उत्तर आलं नाही. त्याबाबत कायदा आहे का नाही, असेल ही किंवा नसेनही, पण जे असंवैधानिक असलेलं उपमुख्यमंत्री पद मात्र दोन-दोन आहेत.

मग सरकार विरोधीपक्ष नेतेपद देण्यास का घाबरतंय. इतकं मजबूत सरकार असताना ते कोणाला घाबरत आहेत? दोनशेच्या वरती जागा निवडणून आल्या आहेत. केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद राज्य सरकारवर आहे, तरीही सरकार विरोधीपक्षनेते पद देण्यास घाबरत आहेत.

जर तुम्ही विरोधी पक्षनेत्यासाठी नियम लावत असाल तर असंवैधानिक असलेल्या उपमुख्यमंत्री पददेखील रद्द करा. त्यांच्याकडे जे पद खाते असतील त्यावरून त्यांना ओळखा,अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. उपमुख्यमंत्री पदाला काही महत्व नसतं. एक नंबर महत्त्वचं असतं, तर दोन आणि तीन नंबरला काही महत्त्व नसतं. विरोधी नेतेपदला लोकसभेत महत्त्व आहे, ते दिलं गेलं पाहिजे.

"शेतकऱ्यांच्या पॅकेजचं ठिबक सिंचन झालं?

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची घोषणा केली होती. त्या मदतीच्या पॅकेजचं काय झालं. त्याचे ठिबक सिंचन झाले का असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावलाय. मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा झाली असून त्यांना एक रुपये आणि दोन रुपयांचा विमा देण्यात आला. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं. अनेक ठिकाणी पिके सडून गेली. विद्यार्थ्यांची पुस्तके वाहून गेली. काही ठिकाणी शेतजमिनी वाहून गेली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भलं मोठं पॅकेज जाहीर केलं. मात्र त्या पॅकेजचं ठिबक सिंचन झालंय असा टोला उद्धध ठाकरेंनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?

येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT