Uddhav Thackeray Speech: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये जंगी सभा होत आहे. या सभेसाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली असून उद्धव ठाकरे सभेसाठी उभे राहताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी सुरू होताच उद्धव ठाकरेंनी भाषण थांबवलं. (Breaking Marathi News)
'हे फटाकेसुद्धा शिववसैनिकांसारखेच आहेच, एकदा पेटले की ऐकत नाही. म्हणून कुणी शिवसैनिकांना पेटवण्याचा प्रयत्न करू नये, कारण मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजल्याशिवाय राहत नाही', असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंसह भाजप नेत्यांना लगावला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेसह भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरी देखील मिळत नसेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)
सत्ता असते त्या ठिकाणी लोक जातात. आज माझ्याकडे सत्तादेखील नाही. भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं त्यांना (शिंदे गटाला) दिले. माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय काहीच नाही. तरीदेखील अनेकजण पक्षात येत आहेत. याचं आश्चर्य वाटत आहे, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
बारसू रिफायनरी प्रकल्पावरूनही ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंसह भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. बारसूमध्ये सगळीकडे पोलीस. घरात पोलीस, गच्चीवर पोलीस. एवढा बंदोबस्त सीमेवर लावला असता तर चीन घुसला नसता, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
कोकणी बांधवाच्या मनाविरोधात प्रकल्प रेटवणार असाल तर संघर्ष करू, सगळा महाराष्ट्र बारसूमध्ये आणू, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारला दिला आहे. त्याचबरोबर आज जे बारसू प्रकल्पासाठी मला जबाबदार धरत आहेत. त्यांनीच मी मुख्यमंत्री असताना प्रकल्पासाठी ही जागा सूचवली होती, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.