Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र, हिंदू आणि हिंदीवरून रान पेटवणार

Raj Thackeray And Uddhav Thackeray: हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू, सरकारला घेरण्यासाठी सज्ज झाले आहेत. नेहमी एकमेकांवर टीका करणारे बंधू आता एकाच मुद्द्यावर एकवटले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवणारे ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेत. हिंदी सक्तीवरुन ठाकरे बंधू सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. ऐकलंत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरेंनीही आता आक्रमक पवित्रा घेतलाय.

महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नसल्याचे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. विशेष म्हणजे हिंदू आणि हिंदी कनेक्शचा मुद्दाही खोडून काढलाय. त्यामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रात पेटणार असल्याचं संकेत यातून मिळाले आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांचं नाव घेऊन त्यांना याबाबत आव्हान दिलंय. त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्यावर पुन्हा ठाकरे-फडणवीस संघर्ष पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय.

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. तसंच हिंदू असलो तरी हिंदी नसल्याचं सध्या जवळीक असलेल्या भाजपला ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी काय भूमिका मांडली होती पाहा.

महाराष्ट्रात 'हिंदी' पहिलीपासून का शिकायची?

दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लादण्याचे कारण काय?

महाराष्ट्राचे 'हिंदीकरण' कशासाठी?

हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का?

शालेय अभ्याक्रमातील हिंदीची पुस्तके विकू देणार नाही

गेल्या काही वर्षांपासून उद्धव आणि राज ठाकरेंची अनेक मुद्द्यांवर टोकाच्या विरोधाची भूमिका असते. कारण उद्धव ठाकरे ज्याच्या विरोधात त्याच्याशी राज ठाकरेंची जवळीक असल्याचं वारंवार दिसून आलंय. मात्र गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदीसक्तीच्या मुद्यामुळे उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्रित भाजपच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. आणि हाच मुद्दा दोघांना एकत्र आणणार का याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT