Uddhav Thackeray and family Security  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांची सुरक्षा कमी केलेली नाही; गृह विभागाचं स्पष्टीकरण

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Security of Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अतिरिक्त वाहनं आणि मातोश्रीबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कमी करण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र गृह विभागाने या वृत्ताचे खंडन करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

गृह विभागाने एक निवेदन जारी करून सांगितले की, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. (Marathi Tajya Batmya)

तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे, असे गृह विभागाने सांगितले आहे. (Latest Marathi News)

तसेच, सदरचे वर्गीकृत संरक्षण हे केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT