Udayanraje Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Court: कोल्हापूर खंडपीठ ६ जिल्ह्यातील जनतेच्या हिताचे; उदयनराजेंचा लढ्यास पाठींबा

साम न्यूज नेटवर्क

सातारा : लोकतांत्रिक भारतातील पुरोगामी महाराष्ट्रात (maharashtra) न्यायदानाचे कार्य अधिक सुलभ झाले पाहीजे. कायद्याच्या राज्यामध्ये जलदगतीने, वेळेची आणि पैशाची बचत होवून नागरीकांना न्याय मागता आला पाहीजे. त्यासाठी कोल्हापूर (kolhapur) येथे मुंबई उच्च न्यायालयाचे (bombay high court) खंडपीठ स्थापन केले जावे यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरु असलेला लढा हा अधिवक्त्यांबरोबरच पक्षकार जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या लढ्याला आमचा जाहिर पाठींबा आहेच परंतु आम्हास जे काही करावे लागेल ते सर्वकाही निश्चितपणे आमच्याकडून केले जाईल अशी ग्वाही खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या अध्यक्ष वकील गिरीश खडके, सचिव विजयकुमार तोटे-देशमुख आणि पदाधिकारी यांनी नुकतीच जलमंदिर पॅलेस येथे कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ (kolhapur bench) स्थापन होणेबाबत कृती समितीच्या पुढील कार्यवाहीची माहीती दिली.

सोलापूर (solapur) , सातारा (satara), सांगली (sangli), कोल्हापूर (kolhapur), सिंधुदुर्ग (sindhudurg) , रत्नागिरी (ratnagiri) हे सहा जिल्हे भौगोलीकदृष्ट्या सलग्न आहेत आणि कोल्हापूर हे साधारण या सहा जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती केंद्र आहे. कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाल्यास, वकीलांना आणि पक्षकारांना अत्यंत सोयीचे होणार आहे. पक्षकारांना उच्च न्यायालयात दाद मागण्याची असल्यास सध्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पणजी या चारच ठिकाणी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावता येत आहेत.

गेल्या २० वर्षापासुन ही उच्च न्यायालयाची व्यवस्था आहे. सध्याची लोकसंख्या, वाढते खटल्याचे प्रमाण आणि जलद न्याय यासाठी कोल्हापूर येथे खंडपीठ झाल्यास ते सर्वांनाच अतिशय सोयीचे होणार आहे. आजच्या घडीला न्याय मागण्यासाठी सुध्दा एक प्रकारे अन्याय होत असल्याची भावना सर्वसाधारण पक्षकारांना वाटते. त्यासाठी तातडीने कोल्हापूर येथे खंडपीठ होणे आवश्यक आहे. वकील, पक्षकार यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. न्याय मागणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे आमचा सर्वार्थाने कृती समितीला पाठींबा राहीला आहे आणि येथुन पुढेही राहणार आहे. कोल्हापूर खंडपीठाकरीता जे काही करायचे असेल ते सर्वार्थाने आम्ही करु अशी ग्वाही खासदार उदयनराजे भाेसले यांनी कोल्हापूर आणि सातारा वकील संघटनांचे पदाधिकारी यांना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

SCROLL FOR NEXT