chhatrapati shivaji maharaj, Udayanraje Bhosale, satara saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : ...तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल; उदयनराजेंच्या पाेस्टची जनमाणसांत चर्चा

सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडतील अशी अपेक्षा आहे असे पाेस्टमध्ये म्हटलं आहे.

Siddharth Latkar

Udayanraje Bhosale News : खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांच्या राेखठाेक भूमिकेमुळे ते नेहमी समाजात चर्चेत असतात. केवळ समाजतच नव्हे तर उदयनराजेंची एखादी भूमिका पटाे अथवा न पटाे त्यांची समाज माध्यमात (Social Media) देखील चर्चा हाेत असते. उदयनराजेंच्या फेसबुक वरील एका पाेस्टची आता केवळ चर्चा हाेत नसून त्यांच्या पाेस्टमधील विचारांना नागरिकांचे पाठबळ मिळू लागले आहे. (Maharashtra News)

खासदार उदयनराजे भाेसले यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरील पाेस्टमधून स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभुंचे कर्तुत्व झाकाळले जाईल असे काही कोणी काही करण्याचा प्रयत्न जरी केला असे प्रयत्न हाणुन पाडले जातील. लोककल्याणकारी शिवप्रभुंची तुलना अन्य कोणाशी हावू शकणार नाहीच आणि तसा प्रयत्न देखिल कोणी करु नये अशी माफक अपेक्षा आहे असे म्हटलं आहे.

या पाेस्टमध्ये शिवप्रभुंचा सातरस्ता पोवईनाका येथे असलेले पूर्णाकृती पुतळारुपी शिवस्मारक सर्वांचे प्रेरणास्थान आहे. सदरचे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे. शिवप्रभुंपेक्षा दिग्गज किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणी धाडस करु नये. अधिकार गाजवून, तमाम जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हिन प्रकार जर करीत असेल तर तो जनतेच्या माध्यमातुन हाणुन पाडला जाईल असे नमूद केले आहे.

सातरस्ता म्हणून ओळखला जाणारा पोवईनाका परिसर हे सातारा शहराचे नाक आहे. याठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे स्मारक आहे. या स्मारकाचे सध्या सर्वांच्या सहकार्याने आणि नगरपरिषदेच्या माध्यमातुन चांगले सुशोभिकरण होत आहे.

सातारकरांनाच नव्हे तर येथुन जाणा-या येणा-या सर्वांनाच हा शिवस्मारक परिसर प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणास्थानाचे ठिकाणी अन्य काही महापुरुषांचे स्मारक किंवा आयलॅन्ड करण्याचे कोणी घाटत असेल तर जनतेच्या अस्मितेवर तो घाला असेल असेही नमूद करण्यात आले आहे.

स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभुंचे कर्तुत्व झाकाळले जाईल असे काही कोणी काही करण्याचा प्रयत्न जरी केला असे प्रयत्न हाणुन पाडले जातील. लोककल्याणकारी शिवप्रभुंची तुलना अन्य कोणाशी हावू शकणार नाहीच आणि तसा प्रयत्न देखिल कोणी करु नये अशी माफक अपेक्षा आहे.

राजघराण्याचे जेष्ठ व्यक्तीमत्व राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले (rajmata kalpanaraje bhosale) यांनी मंगळवारी शिवस्मारक परिसराची पहाणी केली आहे. या ठिकाणी अन्य काही नको अशी प्रामाणिक भावना आणि सर्वसामान्य सातारकरांच्या मनातील भूमिका त्यांनी येथे प्रथमदर्शनी मांडल्याचे पाेस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच या शिवस्मारक परिसरालगत छत्रपती संभाजी महाराज आणि शाहुनगरीचे संस्थापक, ज्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा आटकेपार झेंडा फडकविण्यात आला त्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या दोन एैतिहासीक व्यक्तीमत्वांची शानदार स्मारके उभारण्याची संकल्पना आहे. आमचा कोणाला विरोध नाही असेही नमूद करण्यात आले आहे.

परंतु या संकल्पित स्मारकांना आणि शिवस्मारकास अडचणीच ठरेल असे कोणतेही कृत्य शिवस्मारक भुमीमध्ये होवू दिले जाणार नाही असे सौ. रंजना रावत यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शिवस्मारक परिसराचे पावित्र्य जतन करण्याचे आणि ते उत्तरोत्तर वर्धिष्णु करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.

सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडतील अशी अपेक्षा आहे. त्यातुनही शिवप्रभुंच्या स्मारकरुपी पराक्रमाचा अवमान होईल असे कोणतेही कृत्य कोणीही करण्याचा प्रयत्न केला तर सर्व सातारकर एक होवून, हा कुटील प्रयत्न उलथवून लावतील असा विश्वास आहे माजी नगराध्यक्ष सौ. रंजना रावत (ranjana rawat) यांनी पत्रकार मित्रांशी संवाद साधला असे नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT