Udayanraje Bhosale and Shivendra Raje Saam Tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale: दोन्ही राजेंवर महत्त्वाची जबाबदारी? उदयनराजेंची केंद्रात वर्णी लागणार? राज्य मंत्रिमंडळात शिवेंद्रराजेंना संधी मिळणार?

Shivendra Raje News: सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागातून भाजपचा एकमेव खासदार विजयी झालाय. त्यामुळे उदयनराजेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवेंद्रराजेंची भक्कम साथ मिळाल्यामुळे हा विजय सुकर झालाय.

Satish Kengar

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. पुढे निवडणूक जिंकण्यासाठीही उदयनराजे खूप परीश्रम घ्यावे लागले. शरद पवार गटाचे उमेदवार शशीकांत शिंदे याच्याशी अटीतटीची लढत झाली. आजपर्यंत सातारा मतदारसंघांमध्ये भाजपला लोकसभेला अपयश आले होते. मात्र शर्थीच्या लढतीत अखेर उदयनराजेंनी बाजी मारली. आता त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागातून भाजपचा एकमेव खासदार विजयी झालाय. त्यामुळे या भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता खासदार उदयनराजेंना केंद्रात महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

एकीकडे उदयनराजे यांचा विजय झाला असताना राज्यात भाजपची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे. यामधील एक मुख्य कारण म्हणजे मराठा आंदोलन हाताळताना भाजपला आलेले अपयश. त्यामुळे आता उदयनराजेंच्या माध्यमातून मराठा समाजाचा राग कमी करण्याचा प्रयत्न आहे.

शशिकांत शिंदे यांचे मूळ गाव जावळीमध्ये येत असल्याने या भागातून शिंदेंना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा विश्वास पवार गटाला होता. मात्र आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यपद्धतीवर मतदारांनी विश्वास टाकल्याने जावळी विधानसभा मतदारसंघात तब्बल 36 हजारांचे मताधिक्य उदयनराजेंचा पारड्यात पडले आहे. त्यामुळेच उदयनराजे हे विजयापर्यंत पोहोचू शकले. विजयानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची भेट घेऊन या गोष्टीची जाहीर कबुलीही दिली होती.त्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी भाजपचं सरकार असताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांना राज्यात मंत्रिपद मिळालं होतं. लोकसभेतील विजयानंतर सातारच्या गादीला मान देऊन दोन्ही राजेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digital Arrest Crime : व्हिडीओ कॉल उचला अन् ५८ कोटी गमावले, मुंबईतील व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत लुबाडलं

Pune : प्रवाशांच्या अन् चालकाच्या जीवाशी खेळ, पुण्यात दरवाजा नसलेली लालपरी धावली; VIDEO व्हायरल

Fact Check : अजित आगरकरची हक्कालपट्टी? निवड समितीच्या अध्यक्षपदी रवी शास्त्रींची नियुक्ती होणार?

Maharashtra Live News Update: निलेश गायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या "त्या" एजंटची चौकशी होणार

Afternoon Sleep: दुपारची झोप घेणं शरीरासाठी फायदेशीर की घातक? तज्ज्ञांनी नेमका काय सल्ला दिला?

SCROLL FOR NEXT