

पुण्यात भाजपचा मेगा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे
पुण्यात भाजपने मविआला मोठा धक्का दिला
शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात गळती
कोथरूडसह पुण्यातील राजकीय समीकरणे बदलली
पुण्यात भाजपच्या ऑपरेशन लोटसला मोठं यश मिळत आहे. भाजपने पुण्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. शिवसेनेच्या नगसेवकांनी पक्षाची साथ सोडली असून भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत इतर पक्षांमध्ये गळती सुरूच आहे. हे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
भाजपाच्या प्रवेशाचा दुसरा अंक मुंबईत नव्हे तर पुण्यातच होणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता भाजप कार्यालयात पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईच्या मेगा प्रवेशानंतर आता पुण्यातील अनेक आजी-माजी नगरसेवकांचे इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचे प्रवेश आज पुण्यात होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ते आज भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.
पुण्यातील कोथरूडची देखील समीकरणे बदलली आहेत. शिवसेना उबाठाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठाचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संजय भोसले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उपशहर प्रमुख होते. राष्ट्रवादीचे अनेक नेते ही आज प्रवेश करण्याची शक्यता आहेत. दरम्यान, पुण्यात भाजपची पुन्हा एकदा मेगा प्रवेश सुरू झाला आहे. २५ डिसेंबरला मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. पुण्यातील महत्त्वाच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल. त्यानंतर २६ डिसेंबरला भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे.
दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच सध्या शरद पवार गटाचे पदाधिकारी असलेले राहुल कलाटे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकर जगताप आणि पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघन उर्फ बापू काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल कलाटे आज मुंबईमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी राहुल कलाटे आज सकाळी वाकड इथल्या आपल्या निवासस्थानाहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे शहरात भाजपची ताकद वाढणार आहे.राहुल कलाटे हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा मागील कित्येक दिवसापासून रंगत होती राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आज अखेर राहुल कलाटे हे शेवटी भाजपामध्ये प्रवेश घेत आहेत हे आता स्पष्ट झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.