Shocking: धक्कादायक! भाजपाच्या बड्या नेत्याच्या मुलीवर ॲसिड हल्ला, आरोपी खिडकीतून ॲसिड ॲटॅक करून फरार

Late-Night Acid Attack on BJP Leaders Daughter: बिहारमध्ये ॲसिड हल्ल्याची धक्कादायक घटना, भाजप नेत्याच्या २४ वर्षीय मुलीवर रात्रीच्या वेळी हल्ला. पोलिसांकडून तपास सुरू.
Acid attack on woman
Acid attack on womanSaam tv
Published On

बिहारच्या बेगुसरायमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजप नेत्याच्या मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. अॅसिड हल्ला झाल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. सध्या तरूणीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे परिसरात काहीकाळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, मुलीच्या वडिलांचे नाव संजय राठोड आहे. ते भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे. त्यांना २४ वर्षांची मुलगी आहे. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती तरूणीच्या घराबाहेर रेकी करत होते. त्यांनी खिडकीतुन तरूणीवर अॅसिड हल्ला केला. नंतर आरोपी फरार झाले. या घटनेनंतर तरूणीला तातडीने खासगी रूग्णालयत दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Acid attack on woman
Shiv Sena "सावध राहा साहेब, तुमच्या मुलाची सुपारी दिलीय"; शिंदे गटातील बड्या नेत्याच्या मुलाच्या जीवाला धोका

संजय सिंह यांनी संपूर्ण घडलेल्या घटनेची माहिती मध्यरात्रीच पोलिसांना दिली. या प्रकरणानंतर संजय सिंह म्हणाले, माझ्या मुलीसोबत अत्यंत वाईट घटना घडली. या प्रकरणी प्रशासनाने कडक करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Acid attack on woman
Kerala: पँन्ट काढायला लावली, गळ्यात पट्टा बांधला अन् पैसे...; कंपनीचे कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन, VIDEO ने खळबळ उडाली

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, तरूणीच्या खोलीची तपासणी केली असता, तिच्या बेडवर अॅसिडचे डाग दिसून आले आहेत. या घटनेची अधिक चौकशी पोलीस करीत असून, अॅसिड हल्ला नेमका कुणी आणि का केला? याचाही शोध पोलीस घेत आहेत. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर काहीकाळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com