महायुतीत जिथं ज्याचं बळ, तिथं स्वबळ? निकालानंतर बदललं बार्गेनिंग पॉवरचं गणित?

BJP Bargaining Power Increases After Local Body Polls: नगरपालिकेच्या निकालामुळे महायुतीच्या जागा वाटपात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे...कारण निकालामुळे बार्गेनिंग पॉवरचं गणित बदललंय... त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीचं गणित नेमकं कसं असणार आहे..
MahaYuti leaders during a public event as alliance dynamics shift following municipal election results in Maharashtra.
MahaYuti leaders during a public event as alliance dynamics shift following municipal election results in Maharashtra.Saam Tv
Published On

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक ही महायुतीसाठी रंगीत तालीम ठरलीये... मात्र निकालांचे महायुतीच्या जागा वाटपात पडसाद उमटण्याची शक्यता आहे... कारण नगरपालिका निकालानं बार्गेनिंग पॉवरचं गणित बदललंय... शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका जिंकल्यानंतर भाजपनं नवी मुंबईनंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेतही स्वबळाचे संकेत दिलेत...

खरंतर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे 117 तर शिंदेसेनेचे केवळ 53 नगराध्यक्ष विजयी झालेत. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय... पश्चिम महाराष्ट्रात भाजपला 23 तर शिंदेसेनेला केवळ 12 नगराध्यक्ष निवडून आणता आले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूरमध्ये भाजपचा डंका पाहायला मिळालाय. त्यामुळे शिंदेसेनेची बार्गेनिंग पॉवर घटण्याची शक्यता आहे...

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात शिंदेसेनेला निर्भेळ यश मिळालंय... त्यात संभाजीनगरमध्ये भाजपला केवळ एकच नगराध्यक्ष निवडून आणता आलाय... त्यामुळे संभाजीनगरमध्ये शिंदेसेना फिफ्टी-फिफ्टीचा नारा देणाऱ्या भाजपची कोंडी करण्याची शक्यता आहे.... एवढंच नाही तर सर्वाधिक ताकद लावूनही सोलापूरमध्ये शिंदेसेनेनं भाजपचा पराभव केलाय... त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि नाशिक महापालिकेत जागा वाटपात शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे...

हे असं असलं तरी राज्यातील एकूण समीकरण पाहता शिंदेंसेनेचे भाजपच्या निम्म्यापेक्षा कमी नगराध्यक्ष जिंकले आहेत.. त्यामुळे भाजपही शिंदेसेनेला मुंबई महापालिकेच्या जागा वाटपात वरचढ ठरणार हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com