Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale, Satara saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : त्यावेळेस तुमचंही लाेक पेंटिंग काढतील : उदयनराजे भाेसले

गेल्या काही दिवसांपासून दाेन्ही राजे एकमेंकावर टीका करु लागले आहेत.

ओंकार कदम

Satara : पेंटिंग बाबतची चर्चा मला माध्यमांमधून समजली. पेंटिंगवरून कोणताही वाद झालेला नाही. किरकोळ गैरसमज झाला होता. मात्र वाद वगैरे काही नाही असे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज सातारा (satara) येथे माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)

शिवेंद्रराजेंची इच्छा असेल तर...

खासदार उदयनराजे भोसलेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंचे चित्र संपूर्ण अजिंक्यतारा किल्ल्यावर काढायला हरकत नाही असा टोमणा मारला होता. यावर उदयनराजेंनी त्यांची इच्छा असेल तर विचार करायला हरकत नाही अशी टिप्पणी केली.

...तर लाेक तुमचे ही पेटींग काढतील

उदयनराजे म्हणाले लोकांचे प्रेम असल्यामुळे ते माझे पेंटिंग काढतात. तुम्हीही लोकांची सेवा करा. लाेकांमध्ये तुमच्याबद्दल प्रेम निर्माण हाेईल आणि त्यांचे देखील पेंटिंग काढली जातील असेही उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता नमूद केले.

मी श्रेयवादात पडणार नाही

मागील 35 वर्षाच्या काळात नगर विकास आघाडीची सत्ता असताना काय झालं आणि आता आमची सत्ता असताना 10 वर्षात नेमकं काय बदल होतोय ते पहा याबाबत मी श्रेयवादात पडणार नाही ते म्हणत असतील त्यांनी केलं तर आमचा नकार नाही. मात्र याआधी साताऱ्याचा विकास का झाला नाही याचा विचार व्हायला हवा असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

Buldhana : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! कॉलेजला जातानाच १९ वर्षाच्या ॠतूजाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT