Virar Ambedkar Jayanti News Saam TV
महाराष्ट्र

Virar Ambedkar Jayanti News: आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू, ३ गंभीर

Virar News: विरामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झालेत.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Virar Ambedkar Jayant Accident News : महाराष्ट्रासह देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भीमसैनिकांकडून जल्लोष साजरात केला जातोय. अशातच विरामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झालेत. (Latest Marathi News)

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विरारच्या कारगिल नगर परिसरात गुरूवारी (१३ एप्रिल) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. रुपेश सुर्वे (वय ३० वर्ष) आणि सुमित सुत (वय २३ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Breaking Marathi News)

नेमकं काय घडलं?

विरारच्या (Virar) कारगिल नगर येथील बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. कागगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते.

त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील ६ जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला . तर ४ जण जखमी झाले.

उमेश कनोजिया (वय १८ वर्ष) राहुल जगताप (वय १८ वर्ष), सत्यनारायण (वय २३ वर्ष) आणि अस्मित खांबे (वय ३२ वर्ष), अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींपैकी अस्मित खांबे याची प्रकृती स्थिर असून उमेश, राहुल आणि सत्यनारायण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

तिघांनाही मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मिरवणुकीतून परताना ट्रॉलीवरील लोखंडी रॉडचा रोहित्राला (ट्रान्सफॉर्मर) धक्का लागल्याने वीजेचा झटका लागून ही दुर्घटना घडल्याची माहिती विरारचे सहाय्यक पोलिस (Police) आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी दिली. या दुर्घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोपरगावातील नरभक्षक बिबट्या ठार, दहशत मात्र कायम

Wight Loss: जर तुम्हाला खरचं वजन कमी करायचं असेल, तर पुढील ३ महिने या ७ टिप्स फॉलो करा, व्हाल फॅट टू फिट

Stress Management: ऑफिसमधल्या वादामुळे झोप उडालीये? काळजी सोडा, 'ही' ट्रिक ठरेल फायद्याची

Pune : संशयित दहशतवादी हंगरगेकरची कुंडली समोर; पुण्यात १५ वर्ष कुठं काम करत होता? तपासात धक्कादायक माहिती उघड

Shocking : लग्न होत नव्हतं, डोक्यात शिरलं अंधश्रद्धेचं भूत; ४ मावशींनी केली १६ दिवसांच्या भाच्याची हत्या

SCROLL FOR NEXT